BREAKING देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा मोठी जबाबदारी, बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून निवड?

BREAKING देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा मोठी जबाबदारी, बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून निवड?

देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Share this:

पाटणा, 14 ऑगस्ट : महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Election) जवळ आली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम पाहतील, असं समजतं. गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही फडणवीस उपस्थित होते, अशी माहिती आहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

बिहार निवडणूक प्रभारीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा समोर आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सी.पी. ठाकूर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'देवेंद्र फडणवीस हे एक उत्तर नेते आहेत आणि निवडणुकांमध्ये ते उत्तम काम करतात,' असं म्हणत सी.पी. ठाकूर यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होत असलेल्या निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीबाबत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यापासून इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.

दरम्यान, बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. तर दुसरीकडे, निवडणूकपूर्व आघाड्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतही सुरू झाली आहेत. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटात बिहारमध्ये राजकीय पारा वाढण्यासाठी शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या