Home /News /mumbai /

'कोरोनाबाबतच्या पालिकेच्या नव्या निकषामुळे मुंबईचा धोका वाढला'; फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

'कोरोनाबाबतच्या पालिकेच्या नव्या निकषामुळे मुंबईचा धोका वाढला'; फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यामुळे मुंबईचा धोका वाढत असल्याचं सांगितलं आहे.

    मुंबई, 17 एप्रिल : मुंबई महापालिकेने यापुढे कुणाच्या Covid-19 साठी चाचण्या करायच्या आणि कुणाच्या नाही याविषयी 12 एप्रिलला एक आदेश काढला, त्याचा हवाला देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यामुळे मुंबईचा धोका वाढत असल्याचं सांगितलं आहे. भाजप नेते फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)कोरोना चाचणीबद्दल स्पष्ट निर्देश दिले आहेत. अतिधोकादायक (High risk)गटात मोडणाऱ्या व्यक्ती कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली असेल आणि कोरोनाची कुठलीही लक्षणं जरी तिच्यात दिसली नाहीत तरी पाचव्या दिवसापासून चौदाव्या दिवसापर्यंत एकदा तपासणी करावी, असं ICMR ने स्पष्ट केलं आहे. लक्षण दिसत नसलेलासुद्धा (Asymptomatic) कोरोना पॉझिटिव्ह असू शकतो आणि तो कोरोनाचा विषाणू संक्रमित करू शकतो. त्यासाठी अशी चाचणी आवश्यक असल्याचं ICMR चं म्हणणं आहे. फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात 12 एप्रिलच्या मुंबई महापालिकेच्या आदेशाचा उल्लेख करून म्हटलं आहे की, ICMR च्या सूचना या राष्ट्रीय पातळीवर सारे पाळत असल्याने त्यात बदल करायची काही गरज नव्हती. पण तरीही मुंबई महापालिकेने आदेश काढून या चाचणीच्या नियमात बदल केले आणि त्यानंतर 15 एप्रिलला पुन्हा एक आदेश काढून आणखी संभ्रम निर्माण केला. पुणेकरांनो सावधान! मुंबईच्या धारावीसारखे पुण्याच्या या भागात सापडताहेत सर्वाधिक अतिजोखीम असलेल्या व्यक्तीला पाचव्या दिवशी निरीक्षण करून लक्षणं दिसली तरच चाचणी करण्यात येण्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. यामुळे मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कदाचित कमी होईल. पण यामुळे धोका वाढेल. कारण चीनमध्ये कोरोनाच्या 44 टक्के प्रकरणांमध्ये लक्षणं नसलेल्या व्यक्तींकडून दुसऱ्यांना संसर्ग झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3202 वर, 300 रुग्ण बरे होऊन गेले घरी मुंबई महापालिकेला आपली कोरोनाची रणनीती बदलण्यास आपण निर्देश द्याल अशी आशा आहे, असं फडणवीस यांनी शेवटी म्हटलं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Uddhav thackeray

    पुढील बातम्या