मुंबई, 01 जून: 'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारची जबाबदारी नसून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) भुलभुलय्या करत आहेत', अशी टीका कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत ओबीसी जनगणना आरक्षण रद्द करण्यास राज्य सरकार जबाबदार असून राज्य सरकारने दुर्लक्षित केले म्हणून आरक्षण बद्दल झाले ,अशी टीका केली होती. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास त्यास केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं टीका केली.
Paytm अलर्ट! तुम्हालाही कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय का? सावध राहा, होऊ शकते फसवणूक
'केंद्र सरकारने राज्यात ओबीसी संदर्भात असलेली आकडेवारी कोर्टासमोर सादर केली नाही. राज्य सरकार वारंवार विनंती करत होते. ओबीसी समाजाचा डाटा उपलब्ध नसून तो केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. केंद्र सरकारला राज्य सरकारने विनंती देखील केली होती की, कोर्टात संबंधित आकडेवारी सादर करावी. परंतु, केंद्र सरकारने ओबीसी जनगणना जुनी आकडेवारी सादर केली नाही' असा आरोप भुजबळ यांनी केला.
'ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी आज रात्री एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यासह महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह काही महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली.
मिक्स अँड मॅच लसीकरण फायदेशीर ठरेल का? जाणून घ्या काय सांगतात अभ्यासक
पदोन्नती आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित होते. 'जो अध्यादेश काढण्यात आला होता त्याला तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाची आहे, त्यावर तोडगा काढण्याबाबत लवकरच विचार केला जाईल आणि सकारात्मक चर्चा झाली', अशी माहिती सुद्धा छगन भुजबळ यांनी दिली.
कायदेशीर तज्ञ आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक करणार आहेत आणि त्यानंतर यावर तोडगा काढला जाईल, असं समजतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chagan bhujbal