Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे झाले आहे, संजय राऊतांचा टोला

देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे झाले आहे, संजय राऊतांचा टोला

'आम्ही सगळे म्हणतो की चौकशी करा मात्र विरोधी पक्ष नेते चौकशी नको त्यांना फाशी हवी आहे, अशी मागणी करत आहे'

  मुंबई, 25 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी पाळत नाही. ते नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते झाले आहे असे वाटत आहे' असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. 'परमबीर सिंग यांनी खरंच हे पत्र लिहिलेले का हा मोठा सवाल आहे. आम्ही सगळे म्हणतो की चौकशी करा मात्र विरोधी पक्ष नेते चौकशी नको त्यांना फाशी हवी आहे, अशी मागणी करत आहे. मुळात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी पाळत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते झाले आहे, असं वाटत आहे. वारंवार राजीनाम्याची मागणी करत असल्यामुळे त्यांचं हसं होत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

  Kavya Chopra ने घडवला इतिहास! JEE Main 2021 मध्ये मिळवले 300 पैकी 300 गुण

  परमवीर सिंग यांनी जे काही आरोप केले आहे, त्या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी केली जाणार आहे. जेव्हा सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी चौकशी केली तर पदावरून दूर होण्याची गरज नसते, असंही राऊत यांनी सांगितलं. संयुक्त पुरोगामी आघाडी अधिक सशक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षापेक्षा वेगळा नेता हवा आहे. त्यामुळे मी नेहमी शरद पवार यांचे नाव घेत राहील आणि माझी मागणी नेहमी राहील, असं मतही राऊत यांनी व्यक्त केलं.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: देवेंद्र फडणवीस, संजय राऊत

  पुढील बातम्या