स्थगिती देण्याशिवाय ठाकरे सरकारचं काहीच काम नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

स्थगिती देण्याशिवाय ठाकरे सरकारचं काहीच काम नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

'काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने ही भूमिका बदलली असून त्यांनी आपल्या मुळ भूमिकेवर कायम राहावं आणि किमान खातेवाटप तरी करावं.'

  • Share this:

मुंबई 10 डिसेंबर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वात मोठा हल्लाबोल केलाय. गेल्या 13 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या सरकारने साधं खातेवाटपही केलं नाही. चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार कुठलंच काम करत नाहीये अशी जोरदार टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केलीय. शेतकरी हे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना केव्हा मदत मिळणार हे माहित नाही. त्यामुळे सगळी कामं बाजूला सारून पहिले शेतकऱ्यांना मदत करा असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं. आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत मात्र सरकारचं वेगात चालत नाही अशी टीकाही त्यांनी केली. फडणवीस पुढे म्हणाले, नागपूरात फक्त नावापुरतं अधिवेशन घेतलं जातंय. हे अधिवेशन 15 दिवसांचं व्हावं अशी मागणी आम्ही केली होती. मात्र ती मान्य करण्यात आलेली नाही. फक्त पाच दिवसांच्या अधिवेशनात काय होणार आहे. खातेवाटप झालं नाही तर मंत्री कशी उत्तरं देणार असा सवालही त्यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत सरकारच्या बाजूने मतदान केलं.

CM उद्धव ठाकरेंचा सत्ता स्थापनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

तर राज्यसभेत विधेयक येणार असल्याने आता काँग्रेस वेगळी भूमिका घेत आहेत. काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने ही भूमिका घेतली असून त्यांनी आपल्या मुळ भूमिकेवर कायम राहात विधेयकाचं समर्थन कारावं असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. खातेवाटपच जर झालं नाही तर उत्तरं देणार कसे असा सवालही त्यांनी केला.

भाजप सेना एकत्र येतील?

नवं सरकार येवून अजुन 15 दिवसही झालेले नसतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी एक दावा केलाय. त्यांच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जोशींच्या या दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मनोहर जोशी म्हणाले, काही लहान-सहान गोष्टींमुळे भाजप आणि शिवसेनात दुरावा निर्माण झालाय. मात्र तो दुरावा दोघांच्याही फायद्याचा नाही. दोनही पक्ष आता वेगळे झाले असले तरी ते पुन्हा एकत्र येणारच नाहीत असं नाही.

CM उद्धव ठाकरेंचा सत्ता स्थापनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

ते एकत्र येवू शकतात. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्यवेळी निर्णय घेतील असं मतही त्यांनी व्यक्त केलं. जोशी पुढे म्हणाले, राज्याच्या भल्यासाठी थोडा त्याग केला पाहिजे. आपल्याला जे वाटतं तसच घडेल असं नाही. त्यासाठी सगळ्यांनीच दोन पावलं मागे यावं असंही त्यांनी सूचवलं. जोशींच्या या दाव्यामुळे राजकारणात नवीन चर्चा सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 07:00 PM IST

ताज्या बातम्या