भाजपने केले उद्धव ठाकरे, पवार आणि राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

भाजपने केले उद्धव ठाकरे, पवार आणि राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

राजकारणात विरोधी पक्षांच्या तंबूत काय चाललंय याची खबरबात काढून घेण्यासाठी अशा प्रकारचे फोन टेप केले जातात असा आरोप कायम केला जातो.

  • Share this:

मुंबई 23 जानेवारी : राज्यातल्या ठाकरे सरकारने भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी काम करायला सुरुवात केलीय. त्या दृष्टीने राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. भाजपचं सरकार असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते असा आरोप करण्यात येत होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही अशा प्रकारचा आरोप केला होता. त्यामुळे गृहमंत्रालयाने आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

भाजपची सत्ता असतानाच्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांची फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे गृहमंत्रालयाने हा आदेश दिल्याचं बोललं जातेय.

राज्य पोलिसांचा सायबर सेल आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. राजकारणात विरोधी पक्षांच्या तंबूत काय चाललंय याची खबरबात काढून घेण्यासाठी अशा प्रकारचे फोन टेप केले जातात असं कायम बोललं जातं.

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भाजपचे नेतेही अशा प्रकारचा आरोप करत होते. सरकारकडून अशा प्रकारची हेरगिरी करणं हे गंभीर मानलं जातं.

मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवारांचं डोकं, भाजप नेत्याचा आरोप

नियमानुसार फक्त न्यायालयाच्या परवानगीनेच अशा प्रकारे फोन टॅपिंग केलं जावू शकतं. राजकारणासाठी फोन टॅप केले जावू शकत नाहीत. यात काही तथ्य आढळलं तर भाजपचे नेते अडचणीत येवू शकतात.

First published: January 23, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading