Home /News /mumbai /

Devendra Fadnavis: 'मला सहआरोपी बनवता येईल का? असे प्रश्न मला विचारण्यात आले' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: 'मला सहआरोपी बनवता येईल का? असे प्रश्न मला विचारण्यात आले' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

'मला सहआरोपी बनवता येईल का? असे प्रश्न मला विचारण्यात आले' देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप

'मला सहआरोपी बनवता येईल का? असे प्रश्न मला विचारण्यात आले' देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप

Devendra Fadnavis: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी तब्बल दोन तास चौकशी केली. अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या घोटाळा प्रकरणातील अहवाल लीक झाल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

    मुंबई, 13 मार्च : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा बदली घोटाळा झाल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर त्याच्या संदर्भातील काही कागदपत्रे, पेन ड्राईव्ह सुद्धा केंद्रीय गृहसचिवांकडे सोपवली. मात्र, गोपनीय अहवाल लीक झाल्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावली. त्यानुसार आज पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांची तब्बल दोन तास चौकशी केली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात बदल्यांचा जो महाघोटाळा झाला. या घोटाळ्याची सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांकडे पोहोचवली. त्यानंतर न्यायालयाने याची चौकशी सीबीआयकडे सोपवली. याचाच अर्थ महाघोटाळा घडला म्हणून सीबीआय ही चौकशी करत आहेत. महाघोटाळ्याची चौकशी राज्य सरकार करु शकत नाही कारण, सहा महिने त्यांनी अहवाल दडवून ठेवला होता. मी जर हा घोटाळा बाहेर काढला नसता तर कोट्यावधींचा घोटाळा दबून राहिला असता. सभागृहात विषय मांडत असल्याने मला अचानक नोटीस सभागृहात जे विषय मी मांडतोय, मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊद सोबत कनेक्शन असेल किंवा विरोधी पक्षाच्या विरोधात हे सरकार कसं षडयंत्र करत आहे. यामुळेच मला अचानक पोलिसांची नोटीस आली. मी पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्यासाठी तयार होतो. पण नंतर पोलिसांनी विनंती केली की, मी तुमच्याकडे चौकशीला आमची टीम पाठवतो. आजच्या चौकशीचा रोख असा होता की, जणूकाही ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टचं जणूकाही मी उल्लंघन केलं आहे. मला आरोपी, सहआरोपी बनवण्यात येईल का अशा प्रकारचे प्रश्न होते असाही गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाचा : देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी; नेमकं काय झालं चौकशीत? देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हा घोटाळा मी बाहेर काढला आहे आणि तो न्यायालयाने सुद्धा मान्य केला आहे. पोलिसांना मी सांगितलं, मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. त्यासंदर्भातील पत्रही मी पोलिसांना दाखवलं. त्यासोबतच पत्रकार परिषदेत मी सांगितलं की, मी ट्रान्सक्रिप्ट किंवा पेन ड्राईव्ह कुणाला देणार नाही कारण हे मटेरिअल सेन्सेटिव्ह आहे. राज्य सरकारला तर ही माहिती देऊ शकत नाही. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागदपत्र राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते. या सर्व कागदपत्रांमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नावे होती आणि आयपीएस अधिकाऱ्यांची कॉम्पिटेंट अथॉरिटी केंद्रीय गृहसचिव असल्याने ही सर्व कागदे मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. तसेच सेन्सेटिव्ह मटेरिअल मी उघड केली नाही. पण त्याचवेळी सीक्रसीचा भंग झाला असेल तर तो कुणी केला? जी कागदपत्रे मी केंद्रीय गृहसचिवांंना दिली ती कागदपत्रे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही. यांचे काळे कारनामे मी बाहेर काढतच राहणार आहे. मी अतिशय जबाबदार नागरिकासारखं सर्व संवेदनशील मटेरिअल प्रसिद्धीच्या मागे न लागता संबंधित यंत्रणेला दिलं आहे. माझा जबाब नोंदवण्याचा उपक्रम झाला आहे त्यातून सरकारला काही हाती लागणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Mumbai police

    पुढील बातम्या