मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला पश्चाताप, म्हणाले 'ते नसते केले तर बरे झाले असते'

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला पश्चाताप, म्हणाले 'ते नसते केले तर बरे झाले असते'

Devendra Fadnavis on morning swearing ceremony: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या अजित पवारांसोबतच्या शपथविधीवर पश्चाताप व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis on morning swearing ceremony: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या अजित पवारांसोबतच्या शपथविधीवर पश्चाताप व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis on morning swearing ceremony: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या अजित पवारांसोबतच्या शपथविधीवर पश्चाताप व्यक्त केला आहे.

मुंबई, 30 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करत पश्चाताप व्यक्त केला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत पहाटे-पहाटे राजभवन गाठत शपथविधी सोहळा पूर्ण केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अवग्या काही तासांतच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या पहाटेच्या शपथविधीवर आता देवेंद्र फडणवीसांनी पश्चाताप व्यक्त केलाय. (Devendra Fadnavis on morning swearing-in ceremony)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. ठाकरे सरकारच्या या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'मुंबई तक'ला एक मुलखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करतानाच ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवरही भाष्य करता जोरदार टीका केलीय.

'ते नसते केले तर बरे झाले असते'

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना म्हटलं, "मी यापूर्वीही म्हटलं आहे आणि आजही मला त्याचा पश्चाताप आहे. ते नसते केले तर बरे झाले असते असं आता वाटत आहे. मी एक पुस्तक लिहिणार असून त्यात सर्व घटना, कुणी आणि कशी बेईमानी केली याबाबत सर्व काही असेल."

वाचा : राज्य मंत्रिमंडळाचे चार मोठे निर्णय

...म्हणून अजित पवारांसोबत शपथविधी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेने विश्वासघात करुन पाठीत खंजीर खुपसला म्हणून आम्ही अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात केवळ सरकार आहे, प्रशासन नाहीये असंही फडणवीस म्हणाले.

पहाटेचा शपथविधी करुन आम्ही जशाच तसे उत्तर देण्याचा विचार केला होता. मला त्याबद्दल नेहमीच खेद वाटतो आणि असं वाटतं की, ते झाले नसते तर बरे झाले असते असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाचा : 'महाराष्ट्रात भाजपची सत्ता पुन्हा येईल', फडणवीसांची सत्ता स्थापनेबाबतची नेमकी भूमिका काय?

कोरोना मृतकांची आकडेवारी ठाकरे सरकारने लपवली

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले, महाराष्ट्रात कोरोना बाधित मृतकांची आकडेवारी सरकारने लपवली आहे. महाराष्ट्र सरकारने 10000 कोविड बाधित मृतकांची आकडेवारी लपवली आहे. ठाकरे सरकारने कोरोनाची स्थिती योग्यरित्या हाताळण्याचं सांगत स्वत:ची पाठ थोपटवून घेतली. मात्र, सत्य ते स्वीकरत नाहीयेत. देशात कोविड मृतकांपैकी 35 टक्के मृत्यू हे केवळ महाराष्ट्रात झाले आहेत.

First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, महाराष्ट्र