मुंबई, 24 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आणखी एक आरोपांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen drive bomb of allegation) टाकला आहे. यामध्ये एका निवृत्त पोलीस अधिकारी आणि मुंबईतील एका मोठ्या राजकीय नेत्याचा (Mumbai political leader) उल्लेख करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई पोलीस दलातील एक सेवानिवृत्त एसीपी आहेत इसाक बागवान (Isaque Bagwan) नावाचे. तसे ते सेलिब्रेटीही आहेत, एन्काऊंट स्पेशालिस्ट होते त्यांना काही पुरस्कारही मिळाले आहेत. पण त्यांच्या बंधूंनी त्यांच्याविरोधात एक तक्रार केलेली आहे. त्याचं बारामती कनेक्शन आहे. दादा तुमच्याशी कनेक्शन नाहीये पण बारामती कनेक्शन आहे. सेवेत असताना त्यांनी बारामतीत त्यांनी मोठी संपत्ती जमा केली. केवळ बारामतीत 42 एकर एनए जमीन खरेदी केली. आपल्याला माहिती आहे की, बारामतीत जागेचे भाव किती आहेत. अजित पवारांचीही इतकी जागा नसेल, त्यांची शेतजमीन असेल पण बिगरशेती नाही.
बारामीतपासून ते मुंबईतील संपत्तीपर्यंतची सर्व माहिती आहे. इसाक बागवान यांनी आपले सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम माणिक बागवान आणि चुलत भावजय यांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली. नोकरीतून निवृत्ती झाल्यावर त्यांनी केवळ एक अर्ज देऊन सर्व मालमत्ता आपल्या नावावर करुन घेतली. इसाक बागवान यांनी कपूर नावाच्या व्यक्तीला ही जमीन विकली आणि तिच जमीन दोन महिन्यांत पुन्हा खरेदी केली असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या व्यवहारात लक्षात येतं की, फरीद मोहम्मद अली बिल्डरच्या नावाने जमीन विकत घेतली होती. हा कोण आहे तर...2017 मध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे क्राईम ब्राँचने अटक केली होती त्यावेळी त्याने सांगितले होते की, फरीद मोहम्मद अली याला मी 10 लाख रुपये मी दिले होते. फरीद मोहम्मद अली याची चौकशी झाल्यानंतर सात दिवसांत त्याचा मृत्यू झाला.
वाचा : देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब, BMC तील भ्रष्टाचाराबाबत केला गौप्यस्फोट
41 लाख रुपयांना हीच संपत्ती फरीद मोहम्मद याने विकत घेतली. ही सर्व संपत्ती 10 वर्षे नावावर ठेवली आणि त्यानंतर 30 डिसेंबर 2020 ला फरीद मोहम्मदच्या मुलाने इकास बागवान याला बक्षिस पत्र म्हणून दिली. यासंदर्भातील पेन ड्राईव्ह आपल्याला देण्याचं कारण आहे की एका राजकीय व्यक्तीने यात मध्यस्थी केली. या पेन ड्राईव्हमध्ये नसीर बागवान याचं स्टिंग ऑपरेशन आहे. ज्यात कशाप्रकारे तो राजकीय नेता बारामीतत गेला.... तो नेता बारामतीचा नाहीये तर मुंबईचा मोठा नेता आहे. मुंबईचा नेता कसा बारामतीत गेला आणि कशाप्रकारे मध्यस्थी केली हे तो सांगत आहे. त्यात तो हे सुद्धा सांगतो की, मुंबईतील कुख्यात डॉन हाजी मस्तान याने मुंबईतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिक आर के शाह याचं अपहरण केलं होतं. त्यावेळी इसाकने हाजी मस्तान सोबत मध्यस्थी करुन त्या बांधकाम व्यवासायिकाला सोडलं होतं. त्या बदल्लयात त्याला मुंबई सेंट्रलला भावाच्या नावाने मिळाला असंही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.