मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /फडणवीसांच्या हाती 'स्टेअरिंग', बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Video

फडणवीसांच्या हाती 'स्टेअरिंग', बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Video

शिवडी- न्हावा शेवा सी लिंकवर फडणवीसांची ड्रायव्हिंग, शेजारी शिंदे

शिवडी- न्हावा शेवा सी लिंकवर फडणवीसांची ड्रायव्हिंग, शेजारी शिंदे

शिवडी-न्हावा शेवा सी लिंकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. या सी लिंकवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही.

मुंबई, 24 मे : शिवडी-न्हावा शेवा सी लिंकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. या सी लिंकवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही. यानंतर फडणवीसांनी गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि गियर टाकला. फडणवीस गाडी चालवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते.

शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचं काम 94 टक्के पूर्ण झालं आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या सी लिंकचं लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सी लिंकमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई प्रवास 20 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. शिवडी न्हावा शेवा सी लिंक 21.8 किमीचा आहे, यात समुद्रावर हा पूल अंदाजे 16.5 किमी आहे. या सी लिंकवर एकूण 6 लेन आहेत.

समृद्धी महामार्गावरही फडणवीसांकडूनच ड्राईव्ह

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर एकत्र प्रवास केला होता, तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांच्या हातातच स्टेअरिंग होतं. नागपूरहून शिर्डीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र रवाना झाले. फडणवीस यांनी कारची स्टेअरिंग आपल्या हातात घेतली. यावेळी कारमध्ये एकनाथ शिंदे हे शेजारी बसले आहे. मर्सिडिज कारमधून दोन्ही नेत्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूरहून शिर्डीपर्यंत दोन्ही नेते एकत्र होते.

विशेष म्हणजे, याआधी जेव्हा एकनाथ शिंदे हे मविआ सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली होती. मर्सिडिज ईलेक्ट्रिक कारने त्यांनी प्रवाास केला होता. त्यावेळी खुद्ध शिंदे यांनी कार चालवली होती. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांच्यासोबत पहिल्यांदाच प्रवास केला.

First published:
top videos