मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देवेंद्र फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, केल्या 5 महत्त्वाच्या मागण्या

देवेंद्र फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, केल्या 5 महत्त्वाच्या मागण्या

'चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे फक्त कागदावरची मदत नको. चौकटीबाहेर जाऊन मदत करा.'

'चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे फक्त कागदावरची मदत नको. चौकटीबाहेर जाऊन मदत करा.'

'चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे फक्त कागदावरची मदत नको. चौकटीबाहेर जाऊन मदत करा.'

मुंबई 6 जून: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी मदत जाहीर केली ती अतिशय तोकडी असून सरकारने तातडीने आणखी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरानंतर त्यावेळी जेवढी मदत करण्यात आली त्याच प्रकारची मदत केली जावी अशी मागणी त्यांनी केली. या भागासाठी जाहीर केलेली 100 कोटींची मदत ही अतिशय अपुरी आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. फडणवीस म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे. त्यामुळे योग्य ती मदत करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जेव्हा महापूरात नुकसान झालं तेव्हा आम्ही काही निर्णय घेतलं होतं त्याच प्रकारचे निर्णय घ्या अशी आमची मागणी नाही मात्र सरकारने पुरेशी मदत करावी असं सांगत त्यांनी काही मागण्याही ठाकरे सरकारकडे केल्या. एनडीआरएफच्या निकषाने आपण नुकसान भरपाई करतो आणि मग केंद्र सरकार आपल्याला आपण दिलेली रक्कम परत करते. गेल्या वर्षी विशेष जीआर काढून एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त मदत केली होती. तशाच प्रकारची मदत केली पाहिजे. कोल्हापूरसाठी 4800 कोटींचे आणि परिसरासाठी 2105 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. 6800 कोटींचं एकूण पॅकेज जाहीर केलं होतं. आता जाहीर केलेले 100 कोटी अतिशय अपुरे आहेत. ते वाढवले पाहिजेत. हे वाचा - जनतेमध्ये घबराट! कोरोनाची लक्षणं नसल्यास 24 तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज घरदुरुस्ती, जनावरांच्या गोठ्यांसाठी टपरी, छोटी दुकानं यांनाही सरकारने नव्याने उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे. जी घरं 15 टक्क्यांपेक्षा जास्त पडली आहे आपण त्यांना दुहेरी मदत केली पाहिजे. ग्रामीण 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपये रोख असे पैसे त्यावेळी पीडितांना दिले होते आताही सरकारने त्याच पद्धतीने तातडीची मदत केली पाहिजे. आज ज्या प्रकारचं नुकसान झाले होतं तिथेही अशाच प्रकारचे एनडीआरएफच्या निकषांपलिकडे जाऊन तातडीने मदत करावी अशी महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले,  एकट्या महाराष्ट्रात 35 हजार सॅम्पल टेस्ट करू शकतो मात्र आपण फक्त 15 हजार टेस्ट करतोय. आज भारतात प्रतिदिन तीन लाख PPE किट तयार होतात.  महाराष्ट्रातल्या फक्त २७ टक्के चाचण्या मुंबईची होत आहेत. मुंबईत कोरोनाच्या अधिक चाचण्या होणं आवश्यक आहे. हे वाचा -  कोरोनाचा धोका; रुग्णालयात जाण्यापूर्वी नागरिकांनी काय घ्यावी काळजी? चीन मधून बाहेर पडणारे उद्योग भारतात येतील, तर महाराष्ट्रातही अनेक उद्योग येण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी राज्य सरकारने तयार असलं पाहिजे.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Uddhav thackeray

पुढील बातम्या