• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना फोन, रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची केली चौकशी

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना फोन, रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची केली चौकशी

देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 • Share this:
  मुंबई, 04 एप्रिल 2021 : महाराष्ट्राला थोर सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. त्यामुळं राज्यातील राजकारणातही कायम सुसंस्कृतपणाची उदाहरणं पाहायला मिळतात. राजकीय मतभेदांवरून नेतेमंडळी कितीही टोकाची टीका करत असली, तरी कौटुंबीक अडचण किंवा सुख, दुःखात एकमेकांना सहकार्य करण्यात मागं पुढं पाहत नसल्याचं दिसून आलंय. याचंच आणखी एक आदर्श उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. सध्याच्या राजकीय स्थितीत प्रत्येक मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमने-सामने आहेत. पण असं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली. वाचा - 'लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास आम्ही विरोध करणार', नवनीत राणांचा आक्रमक इशारा देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहे. रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरुवातीला त्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी क्वारंटाईन झाल्या होत्या पण नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जेजे रुग्णालयात कोरोना लसही घेतली होती. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. वाचा -'सहकार्य असू द्या', विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना पहिला फोन दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यातील चिंता वाढवणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दलही चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातच कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळं राज्यात लॉकडाऊन लावला जाण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांनी सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री व्यक्त करतायत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलतानादेखिल त्यांनी सहकार्य मागितलं असून, फडणवीस यांनी सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय, अशी चर्चा आहे. टीव्ही 9 नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: