Home /News /mumbai /

काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? देवेंद्र फडणवीसांची काँग्रसेला प्रश्नांची सरबत्ती

काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? देवेंद्र फडणवीसांची काँग्रसेला प्रश्नांची सरबत्ती

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संजय राऊतांच्या विषयावरून काँग्रेसवर प्रश्नांचा मारा केला आहे.

मुंबई,16 जानेवारी: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कुख्यात गुंड करीम लाला याला भेटत होत्या असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अंडरवर्ल्ड काँग्रेसला आर्थिक मदत करत होते का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संजय राऊतांच्या विषयावरून काँग्रेसवर प्रश्नांचा मारा केला आहे. इंडिरा गांधी मुंबईत का येत होत्या? अंडरवर्ल्डच्या मदतीने काँग्रेस निवडणुका जिंकत होती का? काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? काँग्रेसला निवडणुका जिंकण्यासाठी मसल पावरची गरज पडायची का? छोटा शकील, दाऊद इब्राहिम मुंबईचे पोलीस आयुक्त कोण हे ठरवत होते, तर राजकारणाचं गुन्हेगारीकरणाची सुरुवात त्या कार्यकाळात सुरु झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोनियाजी, राहुलजी, प्रियांकाजींनी यांनी दिली पाहिजेत. इंदिराजींसारख्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर आरोप होऊनही काँग्रेसचे का ? मुंबईवर हल्ला करणा-यांना काॅंग्रेसनं साथ दिली का? यावर काॅंग्रेस अधिकृत खुलासा का करत नाहीये अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतकी लाचार झाला की, त्यांच्या नेत्यांवर आरोप झाल्यानंतर कोणीही बोलायला तयार नाहीत. दरम्यान इंदिरा गांधी खरंच करीम लालाला भेटत होत्या का याचे काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संजय राऊतांच्या विषयावरून काँग्रेसवर प्रश्नांचा मारा केला आहे. इंडिरा गांधी मुंबईत का येत होत्या? अंडरवर्ल्डच्या मदतीने काँग्रेस निवडणुका जिंकत होती का? काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? काँग्रेसला निवडणुका जिंकण्यासाठी मसल पावरची गरज पडायची का? छोटा शकील, दाऊद इब्राहिम मुंबईचे पोलीस आयुक्त कोण हे ठरवत होते, तर राजकारणाचं गुन्हेगारीकरणाची सुरुवात त्या कार्यकाळात सुरु झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोनियाजी, राहुलजी, प्रियांकाजींनी यांनी दिली पाहिजेत. इंदिराजींसारख्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर आरोप होऊनही काँग्रेसचे मौन का ? मुंबईवर हल्ला करणा-यांना काॅंग्रेसनं साथ दिली का? यावर काॅंग्रेस अधिकृत खुलासा का करत नाहीये अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: A statement, Congress, Devendra Fadnavis, Sanjay raut

पुढील बातम्या