सत्तेच्या वाटणीसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेटही झाली, मनोहर जोशींचा मोठा गौप्यस्फोट

सत्तेच्या वाटणीसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेटही झाली, मनोहर जोशींचा मोठा गौप्यस्फोट

सत्तेच्या वाटपासाठी बोलणी नाही असा दावा केला जात असताना या गौप्यस्फोटामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 31 ऑक्टोंबर : सत्तेतल्या वाटणीवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आणि मान-अपमानाचं नाट्य सुरू आहे. निकाल लागून सहा दिवस झालेत तरी  अजुन राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. दोन्ही पक्षांमधले मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हे मतभेद वाढत आहेत. सत्ता वाटपाची बोलणी सुरूच झालेली नाही असे दावे होत असतानाच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना मोठा गौप्यस्फोट केलाय. सरकारची स्थापना आणि सत्तेची वाटणी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी झाली अशी माहिती त्यांनी दिलीय.

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे युतीत वाढली दरी, उद्धव ठाकरे म्हणाले...

निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये बोलणी सुरूच झालेली नाही असं सांगितलं जातंय. तर माध्यमांमधूनच दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना इशारे देत दबावाचं राजकारण करत आहेत. त्यामुळे हा पेच कधी मिटणार असा प्रश्न विचारला जातोय. त्या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी म्हणाले, बोलणी सुरू झालीय. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेटही झालीय. त्यावेळी शिवसेनेचे इतर कुणी नेते उपस्थित नसावे. मीही यावेळी उपस्थित नव्हतो अशी माहितीही त्यांनी दिलीय.त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या थेट संपर्क असल्याचं म्हटलं जातं. मात्र शिवसेना सत्तेच्या समसमान वाटणीवर ठाम आहे तर मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार नाही त्यामुळे पेच निर्माण झालाय.

शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर नाराजी

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेवर बोलायला नको होतं. अजून भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. सर्व गोष्टी मान्य करायला आपण कपाळ करंटे नाहीत. भाजपला आपण अजूनही मित्र मानतो. त्यांनी असं वागायला नको होतं,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली आहे.

'अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असं काही युतीमध्ये ठरलं नव्हतं. येणाऱ्या सरकारमध्येही मीच मुख्यमंत्री राहणार,' असा दावा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्यामुळे शिवसेना-भाजपची नियोजित बैठक रद्द करण्यात आली. तसंच अजूनही सेना नेत्यांकडू याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर दोन्ही पक्ष कसा तोडगा काढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला मोठा धक्का

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेनंही आपल्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली आहे. शिवसेनेकडून विधीमंडळ पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. युवासेनाप्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेच्या इतर आमदारांनी अनुमोदन देत एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 03:58 PM IST

ताज्या बातम्या