महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल फडणवीसांनी केला थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, पुढे काय घडलं?

महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल फडणवीसांनी केला थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, पुढे काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या संभाषणाविषयी माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : देशव्यापी लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने अनेक मजूर राज्यात अडकून पडले आहेत. या मुद्द्यावरून राजकीय कुरघोडी सुरू आहे. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. अशातच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या संभाषणाविषयी माहिती दिली आहे. ‘केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी चर्चा केली. त्यांचे मन:पूर्वक आभार! त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगीजी यांच्याशी लगेच चर्चा केली. 10 रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार आहेत,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘अजूनही बरेच कामगार बांधव रस्त्याने पायीच प्रवास करताना दिसत आहेत. बहुतेक शहरांमधून पुढे येत असलेले हे चित्र अतिशय विदारक आणि सुन्न करणारे आहे. माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे. या कामगारांना पायी जाण्यापासून तत्काळ रोखावे आणि केंद्र सरकारशी योग्य समन्वय साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल, अशी व्यवस्था करावी. औरंगाबादनजीक घडलेल्या घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज आहे,’ असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला मजुरांच्या प्रश्नावर धारेवर धरलं आहे.

काँग्रेसचा भाजपवर आरोप

स्थलांतरीत मजुरांसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु यातही रेल्वे भाडे आकारण्यात स्पष्टता नाही. 85 टक्के सवलत केंद्र सरकारकडून तर 15 टक्के राज्य सरकारने द्यावेत, असं सांगण्यात आलं.‌ पण प्रत्यक्षात 85 टक्के देण्याचा निर्णय आलाच नाही‌. या मजुरांकडून प्रवासाचे पूर्ण भाडे घेतले जात आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवता आला असता पण केंद्रातील मोदी सरकार हे कोणाचेही ऐकत नाही. त्याचेच परिणाम देशभरातील लाखो मजूर, कामगारांना भोगावे लागत आहेत,’ अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

‘उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यातील मजुरांना मूळ गावी रेल्वेने पाठवण्याचे काम सुरू असून नाशिक, पुणे, भिवंडी, नागपूर येथून रेल्वेने हजारो कामगारांना पाठवलं आहे. बाकीच्या कामगारांनाही टप्प्याटप्प्याने गावी पाठवले जात आहे. काँग्रेस पक्ष पाठीशी असल्याने मजुरांनी धीर सोडू नये, संकट मोठे आहे पण त्याला धीराने तोंड देण्याची आवश्यकता आहे,’ असंही सावंत म्हणाले.

माणुसकी गेली कुठे? परप्रांतीय मजुरांना पोलिसानं पट्ट्यानं मार मार मारलं

मी खरं प्रेम केलं. . आज तुली सोडून जात आहे! असं लिहून तरुणानं घेतला गळफास

First published: May 9, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या