माजी मुख्यमंत्र्यांची Marriage Anniversary अमृता फडणविसांनी दिल्या 'या' शुभेच्छा

माजी मुख्यमंत्र्यांची Marriage Anniversary अमृता फडणविसांनी दिल्या 'या' शुभेच्छा

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला अमृता फडणवीसांनी दिल्या खास शुभेच्छा.

  • Share this:

मुंबई 17 नोव्हेंबर :माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाचा आज (17 नोव्हेंबर) वाढदिवस. गेली पाच वर्ष मुख्यमंत्री असल्याने त्यांना घरी फारसा वेळच देता आला नाही. त्यामुळे आजच्या वाढदिवशी त्यांनी कुटुंबीयांसमेत जास्त वेळ दिला. या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अमृता फडणवीसांनी देवेंद्र यांना ट्विटरवरून खास शुभेच्छा दिल्यात. देवेंद्र हे लोकांचा माणूस आहेत त्यांना शुभेच्छा आणि या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार असंही अमृता फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

मुख्यमंत्रिपदाच्या काळात देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या कामामुळे जास्त वेळ देता येत नाही असं अमृता फडणवीसांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होत. ते येवढे व्यस्त असतात की त्यांना द्यायचे निरोप हे चिठ्ठीवर लिहून ठेवावे लागतात असंही त्यांनी सांगितलं होतं. या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या डाएटवर खास लक्ष ठेवावं लागतं. त्यासाठी एक खास माणूस लक्ष देतो असंही त्यांनी सांगितलं होतं. अनेकदा वेळेवर जेवायलाही त्यांना वेळ मिळत नाही हेही त्यांनी सांगितलं होतं.

राज्यातल्या सत्ता स्थापनेसाठी शरद पवार आणि सोनिया गांधी उद्या पुन्हा भेटणार!

देवेंद्र यांना चॉकलेट खायला आवडतं त्यामुळे चॉकलेट फ्रिजमध्ये ठेवून त्याला मी लॉक करते असंही त्या म्हणाल्या होत्या. मी काय करावं याचा निर्णय मीच घेते. माझ्या गाण्याच्या आवडीबद्दल त्यांनीही पूर्ण मोकळीक दिलेली आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.

मुलीचा अभ्यास घेणं त्यांना शक्य नाही मात्र तिच्या शाळेतल्या कार्यक्रमांना ते आवर्जुन येतात. आणि आपले बाबा व्यस्त आहेत हे वास्तव आता मुलीनेही स्वीकारलंय असंही त्यांनी सांगितलं होतं. अमृता फडणवीसांच्या या ट्विटवर अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2019 10:27 PM IST

ताज्या बातम्या