ओबीसी आरक्षणासाठी फडणवीसांचा आक्रमक पवित्रा, महाविकास आघाडी सरकारला दिला इशारा

ओबीसी आरक्षणासाठी फडणवीसांचा आक्रमक पवित्रा, महाविकास आघाडी सरकारला दिला इशारा

'ओबीसी आरक्षणाला धक्का आम्ही लावू देणार नाही. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ओबीसी समाजाबद्दलची भूमिका काय ते सांगा'

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : राज्यात मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरून मराठा समाज आक्रमकपणे आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आता भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.  'ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) हात लावाल तर खबरदार,  ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावलेला चालणार नाही' असा इशाराच फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईतील दादर इथं भाजपच्या कार्यालयात  ओबीसी मंचाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या सभेत फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपची भूमिका स्पष्ट केली.

'हे भारत माते मला माफ कर', छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

'भाजपसाठी ओबीसी मोर्चा महत्वाचा आहे, तो फक्त मतांसाठी महत्वाचा नाही. तळागतील व्यक्तींचा विकास होण्याकरता हा मोर्चा आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात विकासाची आस या वंचित समाजाला आहे. योगेश टिळेकर यांनी ओबीसी समाजातील 346 समाजातील किमान 5 जण असले पाहिजे असा मेळावा घ्यावा.  ओबीसी महाविकास मंडळांना एकही पैसा दिला जात नव्हता. पण आमच्या काळात 500 कोटी रुपये दिले होते. पण महाविकास आघाडी सरकारने पुन्हा या महामंडळाचे काम थांबवले आहे. या सरकारने महाज्योतीला एकही पैसा दिला नाही', असा आरोप फडणवीस यांनी केला.

तसंच, 'आम्ही ओबीसींचं वेगळं मंत्रालय केलं होतं. ओबीसींकरता सध्या फक्त बोलबच्चन देत आहे.  या सरकारमधील मंत्री, आमदार, ओबीसी आरक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. हे आम्ही  सहन करणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला हात लावला तर खबरदार, हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही', असा इशाराच फडणवीस यांनी दिला.

'या सरकारचे मंत्री मोर्चे काढत आहे. त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे. लोकांना भटकवण्यापेक्षा मंत्रिमंडळात ठराव आणा की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मंत्रिमंडळात गप्प बसायचं आणि बाहेर बोलायचं, हे कशाकरता?' असा सवालही फडणवीस यांनी विचारला.

पोलीस स्टेशन असावं तर असं! कैद्यानं थेट गुगलवर दिलं 5 स्टार रेटिंग

'ओबीसी आरक्षणाला धक्का आम्ही लावू देणार नाही. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ओबीसी समाजाबद्दलची भूमिका काय ते सांगा, आमची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला हात लावलेला चालणार नाही', असा थेट सवालही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

'ओबीसी समाजात गोंधळ निर्माण केला जात आहे आणि विकास थांबवला जात आहे.  एमपीएससीच्या परीक्षांचं काय होणार ते माहिती नाही.  ओबीसींच्या विकासाचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक वंचितापर्यंत विकास करण्याचं आपलं काम आहे. येत्या काळात ओबीसी मोर्चाची भूमिका महत्त्वाची आहे', असंही फडणवीस म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 1:59 PM IST

ताज्या बातम्या