Home /News /mumbai /

अखेर देवेंद्र फडणवीस बंगळुरूच्या घटनेवर बोलले, म्हणाले...

अखेर देवेंद्र फडणवीस बंगळुरूच्या घटनेवर बोलले, म्हणाले...

 आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत.

आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत.

आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत.

    मुंबई, 18 नोव्हेंबर : कर्नाटकमधील (karantaka) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (desecration of Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Bengaluru)   पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेचा राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनीही या घटनेप्रकरणी पंतप्रधान मोदींना (pm narendra modi) दखल घेण्यास मागणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. भाजपशासित कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं विटबंन करण्यात आल्यामुळे या घटनेचे राजकीय पडसादही उमटले. शिवसेनेनं भाजपच्या कार्यालयाबाहेरही निदर्शनं केली. दिवसभर भाजप नेत्यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून घटनेचा निषेध नोंदवला. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच, असं म्हणत फडणवीस यांनी निषेध नोंदवला. तसंच, 'ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईजी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच, असंही फडणवीस म्हणाले.विशेष म्हणजे, फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बौमय्या यांचे ट्वीट रिट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधानांकडे मागणी दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.  'छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 'नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात,  देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे. राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवत बदलत नाहीत, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 'हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे, अशी मागणीच ठाकरे यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या