संजय राऊत यांच्या 'रोखठोक'ला देवेंद्र फडणवीस यांचं चोख प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या 'रोखठोक'ला देवेंद्र फडणवीस यांचं चोख प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची काळजी करू नये, तर त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी.

  • Share this:

उल्हासनगर, 5 जुलै: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या 'रोखठोक'ला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची काळजी करू नये, तर त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी. सध्या कोविड-19 च्या रुग्णांची काळजी करण्याची गरज आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.

ज्यांना उपचार मिळत नाही अशा कोविड रुग्णांचं काय, हा प्रश्न राऊत यांनी विचारला असता तर चांगलं वाटलं असतं, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा...एकतर्फी प्रेमातून नववधूची दिवसाढवळ्या हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'त खासदार संजय राऊत यांनी आपल्या 'रोखठोक' या सदरात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती झाली नसल्याबाबत आपलं मत मांडलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी काय म्हणाले फडणवीस...

देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवारी) कल्याण आणि उल्हासनगरचा दौरा केला. यावेळी फडणवीस यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत भाजपवर खोचक टीका केली. त्यावर फडणवीस यांनी संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

संजय राऊतांनी 12 आमदारांची काळजी करू नये. त्यांनी आता महाराष्ट्राची आणि कोविड पेशंटची काळजी करण्याची गरज आहे. ज्यांना उपचार मिळत नाही, अशा कोविड रुग्णांचे काय होणार, हा प्रश्न विचारला असता तर मला आनंद झाला असता, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावला. या शिवाय आता ही राजकारण करण्याची वेळ नाही, असंही ते म्हणाले.

'राजकारणातली नवी आणीबाणी' राऊतांचा केंद्र सरकारवर प्रहार

दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्र सरकारवर दैनिक सामनामधून सडकून टीका केली. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांच्या नियुक्तीला होणाऱ्या दिरंगाईवरुन राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात राज्यपालांना लक्ष्य केलं. तसेच ही परिस्थिती राजकारणातील नवी आणीबाणी असल्याचा आरोप केला.

'विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या आहेत. या 12 जागांचे राजकारण आताच सुरु झाले आहे. सरकारने शिफारस केलेले 12 सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले व त्यांनी 105 आमदारांचा सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला दूर ठेवून सरकार बनवले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांत या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची वाटणी होईल. हे 12 सदस्य कोण व त्यांची नेमणूक राज्यपाल करतील काय ? हाच प्रश्न आहे., असं मत संजय राऊत यांनी मांडलं आहे.

हेही वाचा...भाजप ज्येष्ठ नेत्याच्या रथाचा सारथी अत्यवस्थ, मदतीला धावला राष्ट्रवादीचा नेता!

'गृहखात्याचे काम कायदा-सुव्यवस्था, राष्ट्राची, राज्याची सुरक्षा राखणे हे प्रामुख्याने असते. पण गृहखात्याकडे पोलीस, गुप्तचर, राजभवनाचा ताबा असतो. राजकारणासाठी त्यांचा सर्रास वापर 50 वर्षांपासून सुरुच आहे. त्यामुळे पहाटे पहाटे सरकारचा शपथविधी करुन घेणारे राज्यातील नामनियुक्त 12 जागांचे राजकारण नक्कीच करतील व सर्व प्रकरण शेवटी राज्यपालांवर ढकलून नामानिराळे राहतील. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने हे सदस्य निवडू शकत नाहीत. ही यादी मंत्रिमंडळाकडून ठरवली जाते. ती यादी राज्यपालांना बंधनकारक असते असे आपले संविधान सांगते, पण राज्यपाल या यादीवर निर्णय घेण्यास जास्तीत जास्त विलंब करतील. राज्यपाल व गृहखात्याच्या हातात सध्या इतकेच आहे,'असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

First published: July 5, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या