सावरकर वक्तव्यावरून सेनेचा राहुल गांधींवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसांनीही साधला टायमिंग, म्हणाले...

सावरकर वक्तव्यावरून सेनेचा राहुल गांधींवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसांनीही साधला टायमिंग, म्हणाले...

'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये.'

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. सेनेनं आक्रमक होतं, सावरकरांचा सन्मान राखा, अशा शब्दात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कानउघडणी केली आहे. संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपचे नेते विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनीही ट्वीटकरून राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, अशा शब्दात टीका केली आहे.

तसंच, "स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे.

त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे", अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

दरम्यान, त्याआधी  शिवसेनेनं राहुल गांधींच्या सावरकर यांच्या विधानाबद्दल आक्रमक भूमिका मांडली. 'आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कानउघडणी केली.

तसंच विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला, असं राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तसंच नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

'मी राहुल सावकर नाही'

काँग्रेसकडून रामलीला मैदानावर 'भारत बचाव' रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत,  'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला होता.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या ट्वीटमुळे महाविकासआघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. याआधाही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मतदानावरून काँग्रेसने शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. सेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. तर राज्यसभेत सभात्याग केला होता. त्यानंतर आता सावरकर यांच्या व्यक्तव्यवरून ठिणगी पडण्याची चिन्ह आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या