कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यामागंही चाचण्या कमी करणं हे कारण असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 1 लाख क्षमता असतानाही केवळ 34 हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यातही अँटिजेनचं प्रमाण 30 टक्के आहे. ज्याठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या करणं शक्य आहे तिथं अँटिजेनचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, असंही या पत्रात फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यासाठी फडणवीस यांनी दिवसानुसार आकडेवारी पत्रात मांडली आहे. संसर्ग कमी होत असल्याचे दाखवण्यासाठी चाचण्या नियंत्रित केल्या जात असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (वाचा-आता छातीच्या X-Ray वरूनच समजणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार असल्याचा दावा करताना पीआर संस्थेमार्फत जनतेपुढं चित्र निर्माण करण्याचं कारण काय असा सवाल, फडणवीस यांनी पत्रात केला आहे. हा प्रकार कोरोना विरोधातील राज्य सरकारचा संघर्ष कमकुवत करणारा आहे. त्यामुळं ही बनवाबनवी आणि पीआरमार्फत जनतेची दिशाभूल करणं थांबवण्याचे आदेश द्या अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे केली आहे.मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणे,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र pic.twitter.com/NigmpjOfcX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.