शरद पवारांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग', फडणवीसांचा संजय राऊतांना सणसणीत टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग' असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग' असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

  • Share this:
मुंबई, 12 जुलै: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग' असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस म्हणाले आहेत. कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. हेही वाचा...कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी तत्पर असलेल्या प्रसिद्ध डॉक्टरचाच 'कोरोना'नं मृत्यू उद्धव ठाकरे सरकारवर गंभीर आरोप... राज्यात ज्या दिशेने कोरोनाबाबत आपण जातोय ती परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील 46 टक्के मृतांचा आकडा आपल्या राज्यात आहेत. अनेक मृत्युंची नोंद केली नाही आहे. 600 जणांचा मृत्यू अजूनही अपलोड केलेले नाहीत. लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत. संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या केल्या जात आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. 'नया है वह' म्हणत आदित्य ठाकरेंना टोला... 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटतं त्यांना ते मंत्री करु शकतात. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असं नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली. हेही वाचा...बचत करा आणि जमवा 1 कोटी! 'या' योजनेत दरमहा करा इतकी गुंतवणूक अमिताभ आणि अभिषेक यांना लवकर आरोग्यलाभ व्हावा. त्यासोबतच ज्यांना कोरोना झाला आहे. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना देखील फडणवीस यांनी यावेळी केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: