मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ही अपरिपक्वता की श्रेयवाद? 'अनलॉक'वरून फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

ही अपरिपक्वता की श्रेयवाद? 'अनलॉक'वरून फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असे प्रश्न करत राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असे प्रश्न करत राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असे प्रश्न करत राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

मुंबई, 3 जून : राज्य सरकारकडून आज दुपारी कडक निर्बंध शिथील करण्यात आले असल्याचे सांगत अनलॉकचे पाच टप्पे जाहीर (Unlock in 5 levels) केले. मात्र, तासाभरातच महाविकास आघाडी सरकारनं आपल्या या निर्णयावरून यू टर्न घेतला. आता यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असे प्रश्न करत राज्य सरकारच्या (Maharashtra Government) कारभारावर ताशेरे ओढले.

अनलॉकचे पाच टप्पे जाहीर केल्यानंतर या संदर्भात घुमजाव करत राज्य सरकारनं स्पष्टीकरण देत राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असं म्हटलं आहे. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आणि लगेच केलेला घुमजाव यावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला, यावरून आता विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी टीका केली आहे.

भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक करत मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. यापुढं महाराष्ट्राच्या जनतेनं आणि माध्यमांनीसुद्धा काँग्रेस पक्ष, त्यांचे नेते आणि मंत्री यांना अजिबात गांभीर्यानं घेऊ नये. सरकारमध्ये त्यांना कवडीचीही किंमत नाही. साधुंना नालायक म्हणणाऱ्या मंत्री विजय वडेट्टीवार यांची लायकी दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, असे ट्विट त्यांनी केलं आहे.

तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट करून वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपरोधात्मक टीका केली आहे. वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकतं. काही कळत की नाही तुम्हाला वा, असे ट्विट केलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra News