Home /News /mumbai /

'देशात विधानसभेतील सर्वात तरुण अध्यक्ष; महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला', फडणवीसांकडून नार्वेकरांचं कौतुक

'देशात विधानसभेतील सर्वात तरुण अध्यक्ष; महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला', फडणवीसांकडून नार्वेकरांचं कौतुक

नार्वेकर देशातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. अध्याक्षाची भूमिका न्यायमूर्तीसारखी असते आणि महाराष्ट्राने हा नवा रेकॉर्ड केला आहे.

    मुंबई 03 जुलै : एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) आज पार पडली. शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित मानली जात आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं आहे. नार्वेकर देशातील सर्वात तपुण अध्यक्ष आहेत. अध्याक्षाची भूमिका न्यायमूर्तीसारखी असते आणि महाराष्ट्राने हा नवा रेकॉर्ड केला आहे. तुमच्या मतदारसंघात कामासाठी आलो तेव्हा कोणीही तुमच्याबद्दल तक्रार करणारं सापडलं नाही. नार्वेकरांनी लोकहिताची अनेक कामं केली, असं म्हणत फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं. वरच्या सभागृहातील सभापती आणि खालचे अध्यक्ष यांचं नातं सासरे आणि जावयाचं आहे, याचा उल्लेखही फडणवीस यांनी केला. पुढे फडणवीस म्हणाले, पु ल देशपांडे म्हणतात की जावई सासऱ्याचं एकमत होणं कठीण असतं. ते जावयाचा उल्लेख असा करतात की जवाई सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे. पण नार्वेकरांचं आपल्या सासऱ्यांवर खूप प्रेम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नार्वेकरांना म्हणाले, तुम्ही कायदेतज्ञ आहात. अनेक संस्थांचे कायदेतज्ञ म्हणून काम केलं आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचं काम तुम्ही इथे देणार आहात. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळावं यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्ती केला आणि महाराष्ट्राला आधुनेकतेकजे नेण्याचा प्रयत्न...
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Devendra Fadnavis

    पुढील बातम्या