भाईंदर, 16 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला डिजिटल करण्यासाठी डिजिटल इंडिया ही योजना सुरू केली आणि त्याची प्रंचड जाहिरात सरकारने केली. त्याचं फळ आता दिसायला लागलंय लोक डिजिटल पेमेंट्सना सरावलेत. पण याचा आणखीही एक परिणाम दिसून आलाय तो ऐकलात तर तुम्ही पोट धरून हसाल. घडलं असं की मुंबईतल्या मीरा-भाईंदर परिसरातील नवनगर पोलीस ठाण्यात पाच महिन्यांपूर्वी एका आरोपीला गुन्हा केला म्हणून तुरुंगात ठेवलं होतं. तिथून सुटून आल्यावर त्या गुन्हेगारानी इंटरनेटवर गुगल रिव्ह्यू लिहित त्या ठाण्याला 5 स्टार दिलेत.
आयपीएस संतोष सिंग यांनी 12 डिसेंबरला या रिव्ह्यूचा फोटो ट्विट केला आहे. तो पाहून नेटकरी तुफान हसलेत आणि जबरदस्त प्रतिक्रियाही दिल्यात.
कोण आहे हा आरोपी?
मन्सुरी आवेश असं या आरोपीचं नाव आहे आणि पाच महिन्यांपूर्वी तो तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलाय. त्यानी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आल्यावर लिहितात तसा या ठाण्याबद्दल रिव्ह्यू लिहिला आहे.
रिव्ह्यू काय सांगतो?
संतोष कुमार यांनी ट्विटमध्ये रिव्ह्यूमधलं वाक्य लिहिलंय, ‘पोलीस ठाणं इतकं चांगलंय की कुणालाही दुसऱ्यांदा तिथं यावंसं वाटेल.’ नंतर ते विचारतात आता याचं काय करायचं सांगा. गुन्हेगारानी असंही लिहिलंय की मला अटक झाली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. पोलिसांनी मला खूपच चांगली वागणूक दिली आणि तुरुंगही मस्त होता. पोलीस अधिकारी प्रेमळ होते पण हातकडी खूपच घट्ट होती पण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. शेवटी त्यानी लिहिलंय जर त्याला संधी दिली तर त्याला पुन्हा स्टेशनमध्ये यायला आवडेल.
थाना इतना अच्छा कि कोई दुबारा गिरफ्तार हो कर आना चाहे
How do you assess it.#policereforms #policing@ipsvijrk @ipskabra @arunbothra @dubey_ips @arifhs1 @AwanishSharan @PriyankaJShukla @sonalgoelias @editorsunil @TheVijayKedia @ParveenKaswan @upcoprahul pic.twitter.com/eczJebXOmH
— Santosh Singh (@SantoshSinghIPS) December 12, 2020
हे वाचा-मुंबईतील वाकोला परिसरातून प्रवास करताय तर सावधान! धक्कादायक घटना आली समोर
दरम्यान संतोष सिंग यांच्या ट्विटला 2000 लाइक्स मिळाले आहेत. आणि नेटिझन्सनेही यावर अनेक प्रतिक्रिया टाकल्या आहेत. एकानी लिहिलंय, ‘ हातकडीचा प्रश्न तातडीने सोडवायला हवा. या विषयाच्या प्रमुखांनी ती हातकडी गुन्हेगारांना सोयीची करावी.’दुसऱ्याने लिहिलंय,‘ रिव्ह्युवरला दुसरी संधी (तुरुंगात जाण्याची) द्यायला हवी.’ काहींनी तर पोलीस स्टेशनमध्ये वाय-फायची सुविधा आहे का असंही विचारलं आहे. काहींचं तर म्हणणंय हे पोलीस स्टेशन ‘criminal friendly’ करायला हवं. गुन्हेगारांना बर्गर, पिझ्झा खायला घालून त्याचे रिव्ह्यू टुरिझमच्या वेबसाइटवर टाका असंही काहींनी सुचवलं आहे. एकानी तर म्हटलंय,‘अरे बाप रे हा ट्रेंड व्हायला नको. नाहीतर उबर आणि झोमॅटोसारखं पोलीस स्टेशन्सही रेटिंग मागायला लागतील.’ या पोस्टमुळे सगळेच मजा करण्याच्या मूडमध्ये नाहीएत. एकाने आपली व्यथा मांडली आहे. त्यानी लिहिलंय, ‘ याच पोलीस ठाण्यात मी सायबरक्राइमची तक्रार दिली होती त्यावर गेले सहा महिने कारवाईच झालेली नाही. ते गुन्हेगार अजुनही गुन्हे करत आहेत आणि आपले पोलीस सोशल मीडियावर गुन्हेगाराच्या जेलवारीची माहिती टाकून लोकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहेत.’