मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मंत्रालयातल्या लिफ्टमनला अजित पवारांनी विचारला पगार, कर्मचाऱ्याचं उत्तर ऐकून झाले अस्वस्थ

मंत्रालयातल्या लिफ्टमनला अजित पवारांनी विचारला पगार, कर्मचाऱ्याचं उत्तर ऐकून झाले अस्वस्थ

Mantralaya Ajit Pawar Lift Incidents: मंत्रालयातल्या लिफ्टमधून वर जात असतानाचा उपमुख्यमंत्री (Deputy cm) अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक किस्सा समोर आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 25 जुलै: मुंबईतील मंत्रालयात (Mantralaya) दररोज मंत्र्यांची ये-जा होत असते. यावेळी मंत्रालयातल्या लिफ्टचाही तितकाच वापर होत असतो. अशातच मंत्रालयातल्या लिफ्टमधून वर जात असतानाचा उपमुख्यमंत्री (Deputy CM) अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक किस्सा समोर आला आहे.

अजित पवार नवीनच उपमुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी ते मंत्रालयातल्या लिफ्टमधून वर जात होते. त्यावेळी अजित पवारांनी लिफ्टमधल्या लिफ्टमनला (Liftman) त्याचा पगार विचारला. काय किती पगार मिळतो तुला अशी विचारणा त्यांनी लिफ्टमनला केला. त्यावर लिफ्टमन म्हणाला, साहेब आठ हजार मिळतात. हे ऐकताच अजित पवार अस्वस्थ झाले.

राज्यात मृत्यूचं तांडव; पावसानं घेतले 112 जणांचे बळी,  99 हून अधिक बेपत्ता

कामगारांना 15 हजार रुपये किमान वेतन असलं पाहिजे असा कायदा आहे. असा कायदा असतानाही चक्क मंत्रालयातल्या लिफ्टमनला फक्त 8 हजार रुपये कसे मिळतात, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती घेण्यास सांगितलं.

Sangli Flood: सांगलीत पुराचा धोका कायम, वाचा अपडेट

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात लिफ्टमन, सफाई कामासाठी मनुष्यबळाचं कंत्राट दोन कंपन्यांना देण्यात आलं आहे. त्या कामगारांना किती पगार देतात, सरकार कंपन्यांना प्रत्येक कामगारामागे किती पैसा देते याची विसंगती पुढे शोधण्यात आली नाही.

First published:

Tags: Ajit pawar, Maharashtra, Mumbai