मुंबई, 18 सप्टेंबर : इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायभारणीचा कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यूटर्न घेतला आहे. या कार्यक्रमासाठी आजचं सगळं कामकाज रद्द करून ते मुंबईच्या दिशेनं येत होते. पण कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्याहून वाशीपर्यंत आलेले अजित पवार पुन्हा पुण्याच्या दिशेन रवाना झाले आहेत.
इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायभारणीच्या कार्यक्रमाला महत्त्वाच्या आणि दिग्गज नेत्यांना आमंत्रण न दिल्यामुळे नाराजी सत्र सुरू होतं. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही ऐनवेळी आमंत्रण देण्यात आलं. त्यामुळे आजचं सगळं कामकाज रद्द करून ते मुंबईच्या दिशेनं निघाले होते. पण आता ते पुन्हा पुण्यासाठी निघाले आहेत.
शपथविधी असो वा विकास कामाची पाहणी, अजित पवारांच्या स्टाईलने सगळ्यांची उडते झोप!
पुण्यात सकाळी 11 नंतर अजित पवारांनी सर्व कार्यक्रम रद्द केले होते. आधीच कार्यक्रम निमंत्रण यावरून पवार नाराज होते. त्यात आता कार्यक्रम रद्द झाल्याने पवार पुण्याकडे पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चक्क पुणे मेट्रोमध्ये केला प्रवास, पाहा अजित पवारांच्या हटके स्टाईला VIDEO
दरम्यान, इंदू मिलच्या पायाभरणी कार्यक्रमाला भाजप नेत्यांना आमंत्रित न करणं हे दुर्दैवी आहे. बाबासाहेब हे सर्वांचेच नेते होते. त्यांच्या नावाने राजकारण करणं योग्य नाही अशी टीका मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली होती. कोरोनाचा धोका असल्यामुळे या कार्यक्रमासाठी फक्त 16 जणांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. अशात निमंत्रण नसल्याने बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरही नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं होतं.