आर.जे. मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, पालिकेनं बजावली नोटीस

शोभेच्या कुंडीखाली ठेवलेल्या डिशमध्ये साठलेल्या पाण्यात या अळ्या सापडल्या.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2017 10:11 AM IST

आर.जे. मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, पालिकेनं बजावली नोटीस

19 जुलै : 'मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का' असं विचारणाऱ्या आरजे मलिष्काला या महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे. तिच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्यात.

वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील सन राईज इमारतीमध्ये बुधवारी एच वेस्ट वॉर्ड कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. शोभेच्या कुंडीखाली ठेवलेल्या डिशमध्ये साठलेल्या पाण्यात या अळ्या सापडल्या. लिली मेंडोंसा ( ६५ वर्ष) म्हणजे मलिष्काची आई असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.

डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी यासाठी महापालिका मोठ्या प्रमाणावर जनजागृती करते. मात्र तरीही मलिष्काच्या घरी अळ्या आढळल्याने एच वॉर्ड कार्यालयाने नियमानुसार नोटीस बजावली आहे, असं बीएमसीतर्फे सांगण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेने बजावलेली पहिली नोटीस आहे. डेंग्यूच्या अळ्या साफ करा, अशा सूचना या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या नोटीसनंतरही जर डेंग्यूच्या अळ्या साफ झाल्या नाही तर दुसऱ्यांंदा नोटीस बजावण्यात येते. तरीही कोणतीही कारवाई न झाल्यास महापालिकेकडून मलिष्काला दंड ठोठावण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...