• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Delta Plus Variant: डेल्टा प्लसने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' भीती

Delta Plus Variant: डेल्टा प्लसने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' भीती

Delta Plus Variant in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने चिंता वाढवली आहे.

  • Share this:
मुंबई, 23 जून: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव आता कुठे कमी झाला आहे. मात्र, त्याच दरम्यान राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा (Delta Plus Variant of Coronavirus) शिरकाव झाल्याचं समोर आलं. राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण आढळले असून यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत डेल्टा प्लस विषाणू आणि कोरोनाची राज्यातील सद्यस्थिती यावर सविस्तर माहिती दिली आहे. ही बाब चिंताजनक आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सद्यस्थितीत महाराष्ट्रात एकूण 1 लाख 23 हजार सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णांच्या संख्येत 8000 नी वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या ही 65 हजारावर होती ती कमी होऊन 8 हजारांवर आली आहे. मात्र, दैनंदिन रुग्णसंख्या त्याहून कमी होताना दिसत नाहीये. ही बाब चिंताजनक आहे. Explainer : कोरोना लढ्यात Mix and Match Corona vaccine गेमचेंजर ठरू शकते? संक्रमणाचा धोका राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांत डेल्टा प्लस विषाणूचे एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लस विषाणूचे संक्रमण होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे म्हटलं, ॲन्टीबॉडीचा प्रभाव न होऊ देण्याचा गुणधर्म डेल्टा + मध्ये पहायला मिळतोय. 15 मे पासून आरोग्य विभागाने प्रोजेक्ट हातात घेतला प्रत्येक जिल्हयात 100 सॅम्पल पाठवत आहोत. 3400 सॅम्पलमधून ही आकडेवारी समोर आली आहे. अनेक रुग्णांची कोरोनावर मात डेल्टा + चे गुणधर्म चांगले नाही आहेत. आम्ही सर्वप्रथम या रूग्णांना आयसोलेट करत आहोत. ट्रॅव्हल हिस्ट्री घेत आहोत. डेल्टा + बाबत अभ्यास सुरू आहे. डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी एकही मृत्यू नाही.
Published by:Sunil Desale
First published: