नालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेची प्रसुती, दिला गोंडस बाळाला जन्म!

नालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेची प्रसुती, दिला गोंडस बाळाला जन्म!

विवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेबर : रविवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. स्टेशन अधीक्षक रामकेश मीना यांनी तात्काळ 108 क्रमांकावर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांना घटनेची माहिती दिली आणि रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी तिची सुखरूप सुटका केली.

नालासोपारातल्या पश्चिमेकडील हनुमान नगरात राहणारी रेश्मा बेगम (वय 26) ही गोरेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर असताना तिला अचानक कळा सुरू झाल्या. दरम्यान, 9.15 वाजता तिने ब्रिजवरच एका गोंडस बाळाला जन्म दिला. तात्काळ घटनास्ळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी तीची सुटका केली. रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाळ-बाळंतिणीला वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आलंय. दोघांची प्रकृती स्थीर असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 PHOTO रतन टाटांनी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 05:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading