या महाशयांनी चोरली स्वतःचीच आलिशान मर्सिडीज; मुंबई पोलिसांनी 'असा' लावला छडा

या महाशयांनी चोरली स्वतःचीच आलिशान मर्सिडीज; मुंबई पोलिसांनी 'असा' लावला छडा

स्वतःची अत्यंत महागडी, मौल्यवान वस्तू कुणी स्वतःच चोरून नेईल का? इन्शुरन्सचे पैसे घशात घालण्यासाठी दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने असं खरंच केलं. आपली मर्सिडीजसारखी आलिशान महागडी गाडी चोरीला गेल्याचा बनाव त्यानं रचला. पण मुंबई पोलिसांनी तो कसा उघडकीस आणला वाचा...

  • Share this:

मुंबई, 13 जून : स्वतःची अत्यंत महागडी, मौल्यवान वस्तू कुणी स्वतःच चोरून नेईल का? एका व्यापाऱ्याने असं खरंच केलं. मर्सिडीजरखी आलिशान महागडी गाडी चोरीला गेली. ती त्यानेच चोरल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. Mercedes-Benz A-Class या आलिशान गाडीची इन्शुरन्सची भलीथोरली किंमत खिशात घालण्यासाठी या दिल्लीच्या रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने ही चोरी घडवून आणली. पण मुंबई पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं.

विजय रामलाल धवन नावाच्या दिल्लीतल्या व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. विजय धवन दिल्लीत रिअल इस्टेट फर्म चालवतो. त्याच्याकडे Mercedes A class ही आलिशान गाडी होती. ती आपल्या एका मुंबईतल्या मित्राला एका दिवसाकरता हवी आहे, असं सांगून धवनने झुल्फिकार अब्दुल वकील आणि लालबहादूर सिंह या आपल्या सहकाऱ्यांना मुंबईला गाडी घेऊन पाठवलं. धवनने सांगितलेल्या मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये त्याचे हे सहकारी उतरले होते. त्यांनी पार्क केलेली गाडी तिथूनच गायब झाली.

दुसऱ्या दिवशी जागेवर गाडी न दिसल्याने लालबहादूर आणि झुल्फिकार घाबरले आणि त्यांनी विजय धवनला फोन केला. गाडी चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि धवननेच त्यांना तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला सांगितली.

फीसाठी घेतलेलं कर्ज फेडता आलं नाही, आई-वडिलांची मुलासह आत्महत्या

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. पण मुंबईतल्या मित्रासाठी एका दिवसाकरता दिल्लीहून मर्सिडीज पाठवून देणाऱ्या विजय धवनबद्दल पोलिसांना शंका आली. त्यांनी गाडीचं रजिस्ट्रेशन तपासून पाहिलं. ते विजय धवनच्याच नावाचं होतं. त्यानंतर पोलिसांनी धवनचे सहकारी गाडी लावून ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, तिथे आसपासचे सगळे सीसीटीव्ही फूटेज मागवले.

'वायू' पेक्षाही भयंकर होतं या चक्रीवादळांचं तांडव

दरम्यान मर्सिडीज बेन्झच्या शोरूममध्येही पोलिसांनी चौकशी केली. विजय धवन याच्याकडे ज्या क्लासमधली मर्सिडीज होती, ती गाडी फक्त एकाच सेटमधल्या किल्ल्यांनी उघडते असं समजलं. पोलिसांनी आणखी चौकशी केल्यानंतर विजय धवननेच काही दिवसांपूर्वी किल्लीचा दुसरा सेट मागवला होता, अशी माहितीही पोलिसांना समजली.

दरम्यान CCTV फूटेज हाती येताच पोलिसांना चोर सापडला. स्वतःकडे असलेल्या एक्स्ट्रा किल्लीने धवननेच स्वतःची गाडी चोरून नेली आणि पोलिसांत तक्रार दाखल करायचा दिखावा केला. महागड्या गाडीचा तितकाच किमती वीमा त्यानं उतरवा होता. ती किंमत घशात घालायचा धवनचा डाव पोलिसांच्या तपासाने उलटला.

VIDEO : बारामतीत जमिनी लाटणारे दलाल कोण? उदयनराजेंचा कुणावर निशाणा

6 जूनला विजय धवनला पोलिसांनी मुंबईच्या कोर्टात उभा केला. तो 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत होता. गाडी कुठे लपवून ठेवली हे पोलिसांच्या उलट तपासणीत त्यानं कबून केलं. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे.  पुढची सुनावणी सुरू आहे.

ताडोबामध्ये 4 बछड्यांच्या डौलदार लीला, VIDEO व्हायरल

First published: June 13, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading