Home /News /mumbai /

'फ्लॅट देण्यास दिरंगाई केल्यास बिल्डरला होईल 'इतका' दंड'; ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'फ्लॅट देण्यास दिरंगाई केल्यास बिल्डरला होईल 'इतका' दंड'; ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठाणे जिल्ह्यात (Maharashtra) फ्लॅट मिळायला उशीर झाल्याने ग्राहक आयोगाने (Consumer Commission) फिर्यादीच्या पक्षात निर्णय दिला आहे.

    ठाणे, 12 नोव्हेंबर : राज्यातील ठाणे जिल्ह्यात (Maharashtra) फ्लॅट मिळायला उशीर झाल्याने ग्राहक आयोगाने (Consumer Commission) फिर्यादीच्या पक्षात निर्णय दिला आहे. आयोगाने ठाणे जिल्ह्यात एका बिल्डरला फ्लॅटचं पजेशन देण्यास दिरंगाई केल्यामुळे घर खरेदी करणाऱ्या एका दाम्पत्याला 1 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. आयोगाने एका दाम्प्त्याच्या तक्रारीनंतर हा आदेश दिला आहे. तक्रार केल्यानुसार घाटकोपरच्या बिल्डरने टिटवाळ्यातील विनायक क्रुप्रा नावाने एक योजना सुरू होती. ज्यामध्ये तक्रारदाराने 1 मे 2011 मध्ये एक फ्लॅट बुक केला होता. आयोगाने सांगितले की, तक्रारदाराने नोंदणी पूर्ण करीत फ्टॅटसाठी बँकेकडून लोन घेतलं होतं. बिल्डरने डिसेंबर 2013 मध्ये फ्लॅट देण्याचं वचन दिलं होतं. फ्लॅटची संपूर्ण रक्कम दिल्यानंतरही तक्रारदाराला त्या तारखेला फ्टॅट देण्यात आला नाही आणि जानेवारी 2015 पर्यंतही फ्लॅट दिला गेला नाही. तक्रारदाराने आरोप केला आहे की, बिल्डरने दिरंगाई केली आहे नुकसानभरपाई दिली नाही. याशिवाय करारामध्ये दिलेल्या सुविधाही दिल्या नाहीत. आयोगाने आपल्या आदेशात सांगितलं की, बिल्डरने सेवा देण्यात दिरंगाई केली आणि त्याने अनुचित व्यापाराच्या पद्धतीचा अवलंब केला. आयोगाने अधिकारी एस जेड पवार आणि सदस्य पूनम वी महर्षी यांनी यावर निर्णय दिला. 2011 मध्ये तक्रारदारांनी 13 लाख रुपयात फ्लॅट बुक केला होता आणि दुसऱ्या गोष्टींसाठी 45261 रुपये खर्च केला होता. हे ही वाचा-ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीच्या मुक्कामासाठी खास तयारी; वाचा कसा असेल दौरा? याशिवाय आयोगाने सांगितले की, बिल्डरने 5000 रुपये व्याजासह परत करावे, जे त्यांनी तक्रारदारांकडून जानेवारी 2015 मध्ये घेतले होते आणि कोर्टाच्या केसच्या खर्चाव्यतिरिक्त 10000 रुपये देण्यास सांगितले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या