त्यामुळे रोशन भंगाळे नावाच्या समर्थकाने एकनाथ खडसे यांना निराश होऊन फोन केला आहे. खडसे आणि भंगाळे नावाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला हा संवाद व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये खुद्द एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याबद्दल वक्तव्य केले आहे. 'आपल्याला तिकडे (राष्ट्रवादीत) जायचे आहे. पण, तिकडे गेल्यावर पद काही मिळणार आहे की नाही, याचा निर्णय बाकी आहे. उगाच तिकडे जाऊन लाचारासारखे बसण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे पद काय देतात याचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत तिकडे जाणार नाही', असं एकनाथ खडसे यांनी या क्लिपमध्ये सांगितले आहे. पण, हा फोन कॉल कुणी व्हायरल केला हे अजून समोर आले नाही. या ऑडिओ क्लिपची न्यूज18 लोकमतने पुष्टी केलेली नाही. मात्र, ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. एकनाथ खडसेंची आधीही हुकली संधी मुळात एकनाथ खडसे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज आहे. वेळोवेळी त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यामुळे आजचा निर्णय उद्यावर असं करत खडसे टाळत आले आहे. बऱ्याच वेळा खडसेंनीच भाजप सोडणार असे संकेत दिले, नंतर भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर माघार घेतली. विधानसभा 2019 ला एकनाथ खडसे यांना तिकीट देण्यास भाजपाने नकार दिला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खडसे यांना पक्षात येण्यास गळ घातली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार खडसे यांना घ्यायला निघाले देखील होते. पण ऐनवेळी भाजपनं एकनाथ खडसे यांच्या मुलीला विधानसभा उमेदवारी जाहीर केली आणि तिथेच खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश गुंडाळला गेला होता. दरम्यान, आज शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची गट्टी जमली. कोण कुठल्या पक्षात घ्यावं याविषयी तिन्ही पक्ष एक मताने अजून तरी निर्णय घेत आहेत. खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार असतील तर मोठा विरोध शिवसेनेचा असेल. भाजप सेना युती तोडल्याची नाराजी अजूनही सेना विसरू शकली नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीमध्ये खडसेंचा प्रवेश तूर्त होईल ही शक्यता धूसर आहे.तिकडे गेल्यावर काही भेटलं पाहिजे की नाही? एकनाथ खडसेंची ऑडिओ क्लिप व्हायरल pic.twitter.com/M2xjh2TAGK
— News18Lokmat (@News18lokmat) September 30, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.