मुंबई, 22 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज सभा झाली. राज ठाकरेंची सभा होताच शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दीपाली सय्यद या गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यावर टीका करत असल्याचं पहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच हे आंदोलन थांबलेलं नाहीये असंही त्यांनी आजच्या सभेत जाहीर केलं. याच मुद्द्यावरुन दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटलं, "पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला." दीपाली सय्यद यांनी केलेल्या या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहवं लागेल.
पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) May 22, 2022
आजच्या सभेत राज ठाकरे म्हणाले, आज भोंग्यांचा विषय काढला आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. जवळपास 92 ते 94 टक्के, ठिकाणी आवाज कमी झाले आहेत. खरंतर माझी मागणी आवाज कमीची नाहीचय तर लाऊडस्पीकरच निघाले पाहिजे.
वाचा : मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण; राणा दाम्पत्याला राज ठाकरेंनी सुनावले
राज ठाकरे पुढे म्हणाले, लाऊडस्पीकरचं आंदोलन हे एकादिवसाचं आंदोलन नाहीये. या गोष्टीला जर सातत्य नसेल तर पुन्हा सर्व गोष्टी सुरू होतील. ते फक्त तुम्हाला चेक करत आहेत. तुम्हाला तपासत आहेत. हे जिवंत आहेत, हे विसरले सोडून द्या. हळूहळू पुन्हा आवाज वर यायला सुरू होणार. सारख्या सारख्या गोष्टी होत नाहीत. आत्ता सुरू केलं आहे ना... एकदाचा तुकडा पाडून टाका. म्हणून मी आता एक पत्र तुम्हा देणार आहे. आत्ता नाही येत्या दोन-चार दिवसात तुम्हाला पत्र देईल. माझ्या सर्व महाराष्ट्रसैनिकांना विनंती आहे की, प्रत्येक घराघरात हे पत्रक पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येकवेळी आंदोलन रस्त्यावर येऊन केलं पाहिजे हे गरजेचं नाहीये.
'अयोध्या दौऱ्याकरता मोदींची मदत घ्यावी'
दीपाली सय्यद यांनी यापूर्वीही राज ठाकरेंवर टीका केली होती. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Pune, Raj Thackeray, Shiv sena