ठोस पुरावे नाही, सनातन बंदीसंदर्भात केसरकरांचा यू-टर्न

ठोस पुरावे नाही, सनातन बंदीसंदर्भात केसरकरांचा यू-टर्न

सनातन बंदीसंदर्भात याआधी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. याबद्दल केंद्राने आमच्याकडे विचारणा केली होती.

  • Share this:

मुंबई, 23 आॅगस्ट : सनातन बंदीबाबत राज्य सरकार खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न आता समोर येतोय. सनातन बंदीचा प्रस्ताव नव्यानं केंद्राकडे पाठवल्याचा दावा करणाऱ्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता पण आता घुमजाव केलंय. सध्या तपास अगदी प्राथमिक स्तरावर असल्यानं बंदीचा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका दीपक केसरकरांनी घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होतं.

डॉ.दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरात हिंदुत्ववाद्याचं अटकसत्र सुरू आहे.सनातन संस्थेची संबंधीत संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे, वैभव राऊत, शरद कळसकरला ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी अखेर सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्राकडे याबद्दल प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती दिली होती.

सनातनवरच्या बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे अशी माहिती खुद्द गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी दिलीय. आधीच्या प्रस्तावात त्रुटी असल्यानं नव्या प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलंय होतं. पण आज अचानक केसरकर यांनी घूमजाव केलंय.

सनातन बंदीसंदर्भात याआधी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. याबद्दल केंद्राने आमच्याकडे विचारणा केली होती. त्याबद्दल हवी ती माहिती देण्यात आली. पण आता जी मागणी होत आहे ती प्राथमिक स्तरावर आहे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या आम्ही काहीही बोलू शकत नाही आणि काहीही कारवाई करू शकत नाही असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, याआधीही सनातन संस्थेवर बंदीची मागणी झाली होती. 2015 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन विरोधात काही ठोस पुरावे मिळाले तर निश्चितपणे त्यांच्यावर बंदी घातली जाईल. पण पुरावेच नसतील तर कुणीतरी दबाव आणतंय म्हणून कारवाई करणार नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं.

राज्य सरकारच्या बोटचेपी भूमिकेमुळे सनातन संस्थेवर बंदी इतक्यात अमलात येईल अशी शक्यता यामुळे धुसर झालीय.

दरम्यान, बेळगावातील चिखलेगावाशेजारीच भरत कुरणे यांने एक रिसॉर्ट बांधलं होतं. याच रिसॉर्टमधून सगळ्या हत्यांचा कट शिजला. आतापर्यंत पकडलेल्या सगळ्या संशयितांनी  चिखले गावामध्ये हजेरी लावली आहे. निर्मनुष्य असलेल्या या परिसरामध्ये घनदाट जंगलात बंदुका चालविण्याचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतल्याची माहिती न्यूज १८ लोकमतला एसआयटीच्या सूत्रांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार विवेकवाद्यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी तीन जण होते. तिघांची नाव न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली आहेत.

यातलं पहिलं नाव आहे मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, दुसरं नाव आहे तत्कालीन पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ आणि तिसंर नाव आहे विजय सोनावणे. पानसरेंच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेच्या कॉम्प्युटरमध्ये धर्मद्रोही नावानं एक फोल्डर सेव्ह करण्यात आला होता.  त्या फोल्डरमध्ये तीघांचे फोटो सेव्ह करण्यात आले होते.

 

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 07:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading