Home /News /mumbai /

'आणखी 2 आमदार संपर्कात, फ्लोअर टेस्टला कोणत्याही क्षणी तयार पण...'; दीपक केसरकरांनी ठेवली ही अट

'आणखी 2 आमदार संपर्कात, फ्लोअर टेस्टला कोणत्याही क्षणी तयार पण...'; दीपक केसरकरांनी ठेवली ही अट

एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की आणखी एक-दोन आमदार गुवाहाटीमध्ये येऊन आमच्यात सामील होतील. त्यांच्या पाठिंब्याने आणि अपक्षांच्या मदतीने आमचं संख्याबळ 51 पर्यंत वाढेल

    मुंबई 27 जून : सध्या महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde Faction) यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधील जवळपास 49-50 आमदारांनी आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील सरकार धोक्यात आहे. सरकार वाचवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत येण्यास तयार नसल्याची ठाम भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतली आहे. अशात आता दीपक केसरकर यांनी पुन्हा या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की आणखी एक-दोन आमदार गुवाहाटीमध्ये येऊन आमच्यात सामील होतील. त्यांच्या पाठिंब्याने आणि अपक्षांच्या मदतीने आमचं संख्याबळ 51 पर्यंत वाढेल. आम्ही येत्या 3-4 दिवसात निर्णय घेऊ आणि त्यानंतर थेट महाराष्ट्रात परत येऊ, असंही ते म्हणाले. पुढे केसरकर यांनी म्हटलं की शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानसभेत कोणत्याही क्षणी फ्लोर टेस्टला सामोरे जाण्यास तयार आहेत. मात्र त्याआधी विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाला मान्यता द्यावी, असं सेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर (Deepkak Kesarkar) यांनी म्हटलं आहे. . आम्ही महाविकासआघाडी सरकारसोबत जाणार नाही, असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोरांची आमदारकी जाणार? शिवसेनेच्या वकिलांनी दिला इशारा, म्हणाले.. 'आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ. आम्ही मनापासून प्रेम करणारे आहोत. जो लढा कोकणात उभा केला, तोच लढा मुंबई उभा करू शकतो. कोकणी माणसांनी शिवसेना उभी केली आहे, असा इशाराही केसरकरांनी दिला. 'आम्ही आमचा गट तयार केला आहे. पुढचा निर्णय काय करायचा हे अजून ठरलं नाही. तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहात, त्याच लोकांनी शिवसेना उभी केली, त्यांनी रक्त आटवलं आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकलं आहे. एकीकडे लोकांना बोलण्यासाठी पाठवलं आणि दुसरीकडे गटनेतेपदावरून काढून टाकलं. हे चुकीचे आहे. अगदी त्यांचं ऐकून घ्या, मग कारवाई करा. पण, असं झालं नाही, असंही केसरकर म्हणाले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या