राज्यातली परिस्थिती नियंत्रणात -केसरकर

राज्यातली परिस्थिती नियंत्रणात -केसरकर

  • Share this:

03 जानेवारी : महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आहे. औरंगाबादमध्ये जी काही प्रमाणात हिंसक परिस्थिती निर्माण झाली. ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा सोशल मीडियाचा वापर खूप चुकीच्या पध्दतीने केला जातोय. त्यामुळे हा तणाव निर्माण झालाय असा दावाही केसरकर यांनी केला. तसंच जो तरूण मृत पावला तो दलित नव्हता. तो दलित असल्याचे मेसेजेस व्हायरल झाले असंही केसरकर म्हणाले.

जिथे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तिथेही आमचे पोलीस काम करतायेत.

राज्यात कृपया करून शांतता पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आवाहनही केसरकर यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2018 04:18 PM IST

ताज्या बातम्या