S M L

दीपक केसरकर म्हणतात, लाल दिवा असलाच पाहिजे !

"लाल दिवा बंद केला ते चांगलंय, पण पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. मंत्री आणि अधिकाऱ्यांची गाडी ओळखणार कशी ?"

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 05:54 PM IST

दीपक केसरकर म्हणतात, लाल दिवा असलाच पाहिजे !

20 एप्रिल : मोदी सरकारने व्हीआयपी संस्कृतीला चाप बसवण्यासाठी लाल दिवा बंद करण्याची घोषणा केली आणि जवळपास सर्वच मंत्र्यांनी लाल दिवे काढून टाकले. पण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे त्याला अपवाद ठरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लाल दिवा नसलेली गाडी वापरली. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची त्यांनी लगेच अंमलबजावणी केली. पण त्यांचे सहकारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं मत थोडं वेगळं आहे. लाल दिवा बंद केला ते चांगलंय, पण पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. मंत्री आणि अधिकाऱ्यांची गाडी ओळखणार कशी ?, लाल दिवा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे, असं मत केसरकरांनी व्यक्त केलं.

तसंच मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. राज्याचं गृह खातं आणि केंद्रीय गृह मंत्रालयात चर्चा व्हायला हवी, असंही ते म्हणाले. जनतेत खरा हा सवाल आहे की कोट्यवधी रुपये खर्चून दिलेल्या सोयीसुविधा बंद होतील का ? त्याचं उत्तर आता  पंतप्रधानांनी द्यावं असंही केसरकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 05:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close