दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने बजावली पालिका आयुक्तांना नोटीस

हायकोर्टाने मुंबई महापालिका आयुक्त, राज्य सरकार आणि नगर विकास विभागाला बजावली नोटीस बजावली असून दोन आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2017 04:28 PM IST

दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने बजावली पालिका आयुक्तांना नोटीस

01 सप्टेंबर : डॉ.दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणाची हाय कोर्टाने दखल घेतलीये. हायकोर्टाने मुंबई महापालिका आयुक्त, राज्य सरकार आणि नगर विकास विभागाला बजावली नोटीस बजावली असून दोन आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिले आहे.

मुंबईत मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसात प्रख्यात डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आयपीसी ३०४ अ म्हणजे निष्काळजीपणे मृत्यू  या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसंच मुंबई मनपानं कोणत्याही स्वयंसेवी संस्थेस ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, मॅनहोल्स बद्दल सुधारणा करण्यासाठी माजी सनदी अधिकारी किंवा तंत्रज्ञाची मदत घेण्यात यावी तसंच या प्रकरणाची जबाबदारी मुंबई मनपाचा जो कोणी व्यक्ती यासाठी जबाबदार असेल ती मुख्यमंत्र्यांनी निश्चित करावी अशा मागण्या या याचिकेत आहेत. या याचिकेत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला प्रतिवादी करण्यात आलं आहे. उद्या मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमुर्तींसमोर हे प्रकरण मेन्शन केलं जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणावर नेमकी कधी सुनावणी होईल हे स्पष्ट होऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...