मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कधी सुरू होणार मुंबईची लोकल सेवा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

कधी सुरू होणार मुंबईची लोकल सेवा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

    मुंबई, 25 जानेवारी : मुंबईतील लोकल (Mumbai Local) रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड,  बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह,  यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. हेही वाचा - मुंबई : आंदोलनकर्ते शेतकरी आज आझाद मैदानात करणार मुक्काम, उद्या असा आहे कार्यक्रम दरम्यान, देशासह राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईकरांची लाइफ लाईन असलेली लोकल सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही लोकल रेल्वे सेवा सुरू केली गेली. मात्र अद्यापही सर्वांसाठी लोकल सुरू करण्यात आलेली नाही. नोकरदारांचे हाल कमी करण्यासाठी मुंबई लोकल सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून याबाबतच्या निर्णयाची घोषणा नेमकी कधी केली जाते, हे पाहावं लागेल.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local, Mumbai News

    पुढील बातम्या