मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, अखेर शिक्षक भरतीची महत्त्वाची घोषणा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, अखेर शिक्षक भरतीची महत्त्वाची घोषणा


शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 20 जुलै : राज्यात गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीचा (Teacher recruitment) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यात 6 हजार शिक्षक भरती करण्यास अखेर राज सरकारने (mva government) परवानगी दिली आहे. राज्यात एकूण 49 हजार पदं रिक्त आहे. त्यापैकी आता 6 हजार पद भरली जाणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीची परीक्षा झाली नव्हती. शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली  आहे.

चीनला नाही स्वतःच्या कोरोना लशीवर भरवसा; लस दिलेल्यांना जर्मन बूस्टर शॉट देणार

शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.

Pegasus Phone Tapping: पेगॅसस प्रकरणावरुन नवाब मलिकांचा भाजपला खडा सवाल

२०१९ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणे शक्य झाले नव्हते. शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यत ६१०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे, असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

First published: