मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /....म्हणून भाजपने ही टूम काढली, तो मास्टरमाईंड कोण? अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

....म्हणून भाजपने ही टूम काढली, तो मास्टरमाईंड कोण? अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

 'आंदोलन करणाऱ्यांच्या मनात आणि ज्यांनी सांगितले त्यांना मला विचारायचं आहे, महापुरुषांचा अपमान, चुकीचे शब्द प्रयोग वापरून मंत्रिमंडळातले चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य वाचलं आहे.

'आंदोलन करणाऱ्यांच्या मनात आणि ज्यांनी सांगितले त्यांना मला विचारायचं आहे, महापुरुषांचा अपमान, चुकीचे शब्द प्रयोग वापरून मंत्रिमंडळातले चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य वाचलं आहे.

'आंदोलन करणाऱ्यांच्या मनात आणि ज्यांनी सांगितले त्यांना मला विचारायचं आहे, महापुरुषांचा अपमान, चुकीचे शब्द प्रयोग वापरून मंत्रिमंडळातले चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य वाचलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 जानेवारी: 'आक्रमकपणे भूमिका मांडली. हे सगळं झाल्यानंतर कुणीच काही बोललं नाही. पण ही क्लुप्ती लढवणारा मास्टरमाईंड तिथे नव्हता. तो बाहेरच होता. त्यांच्या कल्पनेतून आलं आणि सगळीकडे आंदोलन सुरू करण्याचे आले. त्यानंतर सगळीकडे निदर्शनं सुरू झाली, असा आरोपच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसंच, संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत भूमिका मांडली होती. पण त्यांना स्मारकाचा निर्णय पटला नाही, त्यामुळे भाजपने ही टूम काढली की काय, असा संशयही अजित पवारांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नये, असं वक्तव्य अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने राज्यभरात निदर्शनं सुरू केली. अखेर अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड भूमिका मांडली.

'आंदोलन करणाऱ्यांच्या मनात आणि ज्यांनी सांगितले त्यांना मला विचारायचं आहे, महापुरुषांचा अपमान, चुकीचे शब्द प्रयोग वापरून मंत्रिमंडळातले चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य वाचलं आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा शिवरायांची उपमा मुख्यमंत्री शिंदेंना दिली होती. प्रसाद लाड यांनीही शिवरायांच्या जन्मचा नवा जावई शोध लावला होता. गोपीचंद पडळकर यांनीही अफजल खानाने शिवरायांचा कोथळा बाहेर काढला असं विधान केलं होतं. त्यांनी वक्तव्य करूनही माफी मागितली नाही. त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही, याची दखल महाराष्ट्राने घ्यावी, असंही अजित पवारांनी आवर्जुन सांगितलं.

(शिंदे गट, 'पीपल्स रिपब्लिकन' युतीची अखेर घोषणा; मुख्यमंत्र्यांनी पुढचा प्लॅनही सांगितला)

'मी योग्य पणे भूमिका मांडली. ज्यांना पटत असेल त्यांनी घ्यावं, ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. त्यांनी त्यांच्या पक्षाची काय भूमिका घ्यायची ती घ्यावी. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराजरक्षक म्हणावे असा माझा आग्रह आहे. शरद पवार यांनीही भूमिका मांडली की, ज्यांना धर्मवीर म्हणायचं असेल तर हरकत नाही. शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याचे रक्षण करत असताना त्यामध्ये सर्वच गोष्टी येत असतात. स्वराज्याचं रक्षण संभाजी महाराज यांनी केलं, त्यामुळे स्वराज्यरक्षक म्हणेच योग्य आहे. मी असं कोणतेही अपशब्द वापरले नाही. कोणतीही चुकीचे विधान केले. उलट शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर भूमिका मांडावी, असं म्हणत अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली.

'पहिले अजित पवार काही बोलतच नाही, आम्हाला प्रेमाची पत्र आली, पेपरमध्ये सुद्धा आली. त्याची आम्ही नोंद घेतली आणि आक्रमकपणे भूमिका मांडली. हे सगळं झाल्यानंतर कुणीच काही बोललं नाही. पण ही क्लप्ती लढवणारा मास्टरमाईंड तिथे नव्हता. ते बाहेरच होते. त्यांच्या कल्पनेतून आलं आणि सगळीकडे आंदोलन सुरू करण्याचे आले. अजित पवारांची फोटो जाळा, चप्पलेनं मारा, म्हणजे फोटोला मारा. असं चप्पलेनं मारा म्हणजे मग पाहतील की हे, असं म्हणताच एकच हश्शा पिकली.

'छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं. पण पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत असं काही होऊ नये म्हणून स्मारकाची भूमिका मांडली होती. पण त्यांना स्मारकाचा निर्णय पटला नाही, त्यामुळे भाजपने ही टूम काढली की काय, असा संशयही अजित पवारांनी व्यक्त केला.

(कोण कुणाला जेलमध्ये पाठवणार? दीपक केसरकर आणि संजय राऊतांमध्ये जुंपली)

' मी चुकीचं बोललो नाही. मी वादग्रस्त विधान केलं नाही. वादग्रस्त विधान राज्यपालांनी केलं. त्यांच्या आमदारांनी केलं इतर लोकांनी केलं. प्रवक्तांनी केलं. मी माझ्या विधानावर ठाम आहे. शरद पवार यांनी जे काही सांगितलं आहे, ते आमचे सर्वोच्च नेते आहे. त्यांच्या मताशी मी सहमत राहणार आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

'स्वराज्यरक्षक म्हणणं सभागृहाच्या रेकॉर्डवरून काढून टाकणे हे काय काम आहे. जी लोक आंदोलन करत आहे, त्यांनी आत्मपरिक्षण करावं आणि आपल्याच पक्षातील नेत्यांनी जी विधानं केली आहे. त्याबद्दल माफी मागावी का, कुणाला राजीनामा द्यायला सांगावे का, हे त्यांनी सदसदविवेक बुद्धीला विचारून सांगावं, असा टोलाही अजितदादांनी भाजप नेत्यांना लगावला.

First published:

Tags: अजित पवार