मोठी बातमी, वैद्यकीय खरेदीबाबत समितीचा निर्णय राज्यपालांकडून 5 महिन्यांपासून प्रलंबित!

मोठी बातमी, वैद्यकीय खरेदीबाबत समितीचा निर्णय राज्यपालांकडून 5 महिन्यांपासून प्रलंबित!

'वैद्यकीय साहित्य खरेदी करताना मंत्र्यांना साधे नोटिंग लिहण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे, याचे अधिकार मंत्र्यांना द्यावे'

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट येऊन ठेपली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस लढा देत आहे. परंतु, राज्यात वैद्यकीय साहित्य खरेदीबाबत असलेल्या समितीत महाविकास आघाडीचे मंत्री आणि अधिकाऱ्यांचा समावेश करावा याबद्दलचा निर्णय राज्यपाल (governor of maharashtra) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडून प्रलंबित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल (governor) विरुद्ध सरकार (MVA Goverment) असा वाद पेटण्याची चिन्ह आहे.

वैद्यकीय खरेदीसाठी नेमण्यात आलेल्या कमिटीचे अधिकार मंत्री म्हणून आम्हाला द्या, अशी शिफारस महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती. पण, इतर निर्णयाप्रमाणे हा सुद्धा निर्णय राज्यपालांकडून प्रलंबितच असल्याचे समोर आले आहे.  5 महिने झाले तरी  राज्यपाल यांच्याकडून यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

2024 च्या निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा आणि सत्तेतील प्रमुख पक्ष-पटोले

वैद्यकीय खरेदीसाठी ही समिती नेमण्यात आली आहे. याचे अधिकारी याच समितीतील सदस्यांना आहे. यात वैद्यकीय शिक्षण, अन्न औषधी प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी यांचा समावेश आहे. पण, काही वैद्यकीय साहित्य खरेदी करताना मंत्र्यांना साधे नोटिंग लिहण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे, याचे अधिकार मंत्र्यांना द्यावे, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

हा निर्णय युती सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्यावेळी खरेदीचे स्थानिक अधिकार काढून या समितीकडे दिले होते. पण कोणत्याही मंत्र्यांचा थेट संबंध राहणार नाही याची दक्षता घेतली होती.

अवघडच आहे! महिला जेलर पडली कैद्याच्या प्रेमात; आता तिचीही झाली तुरुंगात रवानगी

विशेष म्हणजे, युती सरकारच्या काळात गिरीश बापट आणि गिरीश महाजन यांच्या वादात हे अधिकार मंत्र्यांकडून काढून समितीला देण्यात आले होते. या निर्णयावरून गिरीश बापट चांगलेच नाराज झाले होते.

आता राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट असल्यामुळे राज्य सरकारकडून वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी आम्हाला अधिकार द्यावे, अशी मागणी केली आहे. आता कोरोनाची परिस्थितीत पाहून राज्यपाल याबद्दल सकारात्मक निर्णय घेतील का हे पाहण्याचे ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: April 15, 2021, 10:00 PM IST

ताज्या बातम्या