Home /News /mumbai /

COVID-19 रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट कायम, राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

COVID-19 रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट कायम, राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

दिवसभरात 19 हजार 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 13 लाख 16 हजार 769 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

    मुंबई 14 ऑक्टोबर: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांच्या मृत्यूच्या संखेत होणारी घटही कायम आहे. मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी नव्या रुग्णांची संख्या थोडी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा 10 हजारांच्या खाली होता. आज दिवसभरात 10 हजार 552 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 158 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 19 हजार 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 13 लाख 16 हजार 769 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.71 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 158 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. राज्यात तपासण्यात आलेल्या 78,38,318 चाचण्यांपैकी 15,54, 389 म्हणजे 19.83 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 96 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान,  कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन राज्य शासन वारंवार करत आहे. मात्र लोक नियमांचं पालन करत नसल्याने मुंबई महापालिकेने कठोर कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न वापरता कारवाईत अडथळा आणल्याबद्दल बीएमसीने एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वात पहिल्या लशीसाठी भारतीय राणीने लावली होती जीवाची बाजी; अशी केली जनजागृती राज्यातली ही पहिलीच कारवाई समजली जाते. एक दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रथमेश जाधव (वय 29) असं FIR दाखल झालेल्या व्यक्तिचं नाव असून गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न वापरणे आणि कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. IPC186,188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ग नाही, शाळा उघडणार; लोकल नाही पण मेट्रो चालणार! दुकानं, बाजार नवे नियम? आतापर्यंत 40 हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहिम राबवून ही कारवाई केली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या