मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'हम उसे जिंदा नही छोडेंगे..' मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ व्हायरल

'हम उसे जिंदा नही छोडेंगे..' मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ व्हायरल

अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च : मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मशिदी विरोधात आवाज उठवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना धर्माध शक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय प्रकरण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात ‘लाव रे तो व्हिडीओ’द्वारे मुंबईतील माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झालेली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून 7 ते 8 अनधिकृत दर्गे उभारल्याची माहिती ठाणे शहर मनसेने उघडकीस आणली आहे. तसेच मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद व दर्गे 15 दिवसात हटवा. अन्यथा या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. त्यानंतर आता त्यांनी जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा - 'ते कायदेतज्ज्ञ..' राहुल गांधींवरील कारवाई चुकीची म्हणणाऱ्या बच्चू कडूंना भाजप नेत्याने सुनावलं

काय आहे धमकी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. तर दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणुन प्रशासनाला 15 दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली आहे. अशातच ही धमकीची ऑडिओ क्लिप फिरत आहे. त्यातील काहींनी अविनाश जाधव यांना, "हम उसे जिंदा नही छोडेंगे, कोई गुस्ताख छुप न पाएगा, हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे" अशा धमक्या देण्यात आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: MNS, Raj Thackeray