पतंग काढताना तोल जाऊन रस्त्यावर पडला आणि तितक्यात आली भरधाव गाडी...

पतंग काढताना तोल जाऊन रस्त्यावर पडला आणि तितक्यात आली भरधाव गाडी...

झाडावर अडकलेली पतंग काढण्याच्या नादात एका ११ वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला

  • Share this:

ठाणे, 13 फेब्रुवारी : झाडावर अडकलेली पतंग काढण्याच्या नादात एका ११ वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. ठाण्यातील मुंब्रा येथील ही घटना असून सागर सुरेंद्र चौहान असं या ११ वर्षीय मुलाचे नाव आहे.

मुंब्रा येथील नियाज कम्पाउंडमध्ये राहणारा सागरला मुंब्रातील बिलाल हाॅस्पिटल समोरील रोड डिव्हायडरमध्ये असलेल्या एका झाडावर पतंग अडकलेली दिसली. ती पतंग काढण्यास सागर डिव्हियडरवरुन झाडावर चढवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सागरला झाडावर चढता येत नव्हते. पतंग काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या सागरचा डिव्हायडर वरुन तोल गेला आणि तो थेट रोडवर कोसळला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीने सागरला धडक दिली. त्यात सागरचा हात फॅक्चर झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जखमी झालेल्या सागरवर  सुरुवातीला मुंब्रातीलच प्राईम हाॅस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले होते. मात्र, सागरची तब्येत बिघडतच चालल्याने त्याला शेवटी कळव्याच्या शिवाजी हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथे सागरवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला. दरम्यान, ज्या पिकअप गाडीने सागरला उडवले तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

नागपूरमध्येही पतंग उडवताना इमारतीच्या छतावरून पडून तरुणाचा मृत्यू

दरम्यान, मागील महिन्यात नागपूरमध्येही इमारतीच्या छतावर पतंग उडवीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला होता. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

मकर संक्रांतीच्या दिवशी सादिक हा इमारतीच्या छतावर पतंग उडवत होता. अचानक त्याचा तोल जाऊन खाली पडला. मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले. शरीराच्या इतरही भागावर गंभीर इजा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत सायंकाळच्या दरम्यान त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 07:05 PM IST

ताज्या बातम्या