Home /News /mumbai /

रविवारी राज्यात मृत्यूचं तांडव; एकाच दिवसात विविध घटनांमध्ये तब्बल 43 जणांचा मृत्यू

रविवारी राज्यात मृत्यूचं तांडव; एकाच दिवसात विविध घटनांमध्ये तब्बल 43 जणांचा मृत्यू

आधीच कोरोनाचा कहर त्यात मुसळधार पाऊस..अशात आजचा दिवस हा घातवार ठरला आहे.

    मुंबई, 18 जुलै : रविवारी राज्यातील अनेक भागांमध्ये विविध कारणांमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत, त्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जगणं अवघड झालं आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं तर कोणाचा अंगावर भिंत पडून मृत्यू झाला. मुंबई या स्वप्ननगरीत राहणाऱ्यांची तर पावसामुळे दैना झाली आहे. रविवार ठरला घातवार... चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील (Vikhroli) पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. (ground-plus-one residential building collapsed) उल्हासनगरमध्ये नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या ४ वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू झाला असून रुद्र गुप्ता असे चिमुरड्याचे नाव हे ही वाचा-मुंबईकरांसाठी काळरात्र; 21 जणांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा संगमेश्वर तालुक्यात धामापूर घारेवाडी येथे सहा मुलांपैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी ३ : ३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण ( ३२ ) , चेतन सूर्यकांत सागवेकर ( १८ ) दोघेही रा . धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याबरोबर वाहत जावून या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली. या मुलांसोबत असणाऱ्या औदुंबर प्रकाश पवार ( २७ ) , शुभम शांताराम चव्हाण ( २० ) , राज तुकाराम चव्हाण ( १८ ) , साईल संतोष कांगणे ( १७ ) या चौघांनी बुडणाऱ्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही . यवतमाळ -  पांढरकवडा तालुक्यातील दातपडी इथं एका विवाहितेच्या अंगावर ऑइल टाकून जाळून मारले. मोनिका गणेश पवार असे मृत महिलेचे नाव आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खाजगी क्रुजर गाडी दरीत कोसळुन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 08 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळत असून जवळपास पंधराहुन अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहित समोर आली आहे. चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मावळ तळेगाव येथे पर्यटन बंदीचा आदेश झुगारून पर्यटनासाठी आलेला 21 वर्षीय तरुण इंद्रायणी नदी पात्रात कुंडमळा येथे बुडाला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Death, Maharashtra, Mumbai

    पुढील बातम्या