मुंबई 14 ऑक्टोबर: मायानगरी मुंबईत स्टंट करणाऱ्यांची काहीच कमतरता नाही. सोशल मीडियावर अशा स्टंटबाज युवकांचे VIDEO सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला स्टंट पाहून कुणाही माणसाच्या अंगावर शहारे आल्याशीवाय राहणार नाहीत. इमारतीच्या 22 व्या मजल्यावर खिडकीच्या बाल्कनीमध्ये हा युवक चालताना दिसत आहे. पोलिसांनी त्या जागेचा शोध घेतला असून स्टंटबाज युवक फरार झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या युवकाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या युवकाचा आणि जागेचा शोध सुरू केला. पश्चिम कांदिवलीमध्ये जय भारत इमारतीच्या 22 व्या मजल्यावर हा स्टंट सुरू होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या युवकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
स्टंट करणाऱ्या युवकाचं नाव आणि पत्ता शोधण्यात यश आलं असून युवकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी अदने यांनी दिली. हा युवक स्टंट करत होता आणि त्याचे इतर दोन मित्र हे व्हिडीओ तयार करत होते असंही त्यांनी सांगितलं. पोलीस त्या स्टंटबाज युवकाच्या मित्रांचाही शोध घेत आहे.
मृत्यूला आमंत्रण देणारा स्टंट
मुंबई: इमारतीच्या 22व्या मजल्यावर हातावर चालत तरुणाचा जीवघेणा स्टंट, पोलीस या तरुणाच्या आणि त्याच्या दोन मित्रांचा शोध घेत आहेत. असे स्टंट करून जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. pic.twitter.com/QrpeB8IhuD
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2020
त्या युवकाचा दुसरा मित्रही बाल्कमध्ये उतरून त्याचा व्हिडीओ तयार करत अ्सल्याचं स्पष्ट झालं आहे.
असे जीवघेणे स्टंट करू नका आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. आयुष्यात धाडस करण्यासाठी अनेक चांगली कामं आहेत. तरुणांनी त्या कामात लक्षं घातलं तर त्यांना आनंद मिळेल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.