'सपा'शी फाटता फाटता जुळलं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपाचं घोडं अजुन अडलेलंच

'सपा'शी फाटता फाटता जुळलं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपाचं घोडं अजुन अडलेलंच

' काँग्रेसा अंतिम निर्णय हा दिल्लीत होत असतो. स्थानिक नेत्यांना न विचारताच निर्णय दिल्लीतून घेतले जातात.'

  • Share this:

मुंबई 02 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस राहिलेले असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपाचं घोडं अजुन अडलेलच आहे. बहुतांश जागांवरचं कोडं सुटलेलं असून फक्त काही जागांवर अजुनही चर्चा सुरू असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. लवकरच प्रसिद्धी पत्रक काढून अंतिम जागावाटप जाहीर केलं जाईल असंही ते म्हणाले. जागावाटपाचं गणित किचकट असल्याने हा वेळ लागतो आहे. प्रत्येकालाच जागा हवी असते त्यामुळे अडचण होत असल्याचंही ते म्हणाले.

योग्य जागा मिळत नसल्याने समाजवादी पक्षाने आघाडीपासून फारकत घेत असल्याचं जाहीर केलं होतं. समाजवादी पार्टीने जास्त जागांची मागणी केली होती.

आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण

मात्र काँग्रेसने त्याला नकार दिला होता. शेवटी तीन जागा समाजवादी पक्षाला देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय त्यामुळे आता समाजवादी पक्ष आघाडीत असल्याचं आझमी यांनी स्पष्ट केलं. आझमी म्हणाले, काँग्रेसा अंतिम निर्णय हा दिल्लीत होत असतो. स्थानिक नेत्यांना खरी स्थिती काय आहे याची माहिती असते. मात्र त्यांना न विचारताच निर्णय दिल्लीतून घेतले जातात असं त्यांनी पृथ्विराज चव्हाण यांच्यासमोरच सांगून टाकलं. मात्र आता दिल्लीतूनच निर्णय झाला अशी माहितीही त्यांनी दिली.

'युती'च्या घटकपक्षांची 'या' 14 जागांवर बोळवण, भाजपला मिळणार 150 जागा!

लातूरमध्ये भाजप करणार काँग्रेसची कोंडी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची कोंडी करण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. अमित देशमुख यांच्याविरोधात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण

लोकसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाचीच कोंडी करण्याची रणनीती आखली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या नांदेड मतदारसंघात कोंडी केली. परिणामी चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही भाजपचे यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यानंतर आता अमित देशमुख यांचीही कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading