VIDEO: वांद्रे-वरळी सी लिंकवर आढळला 4 फूटांचा मृत डॉल्फिन, JCBच्या सहाय्यानं काढलं बाहेर

VIDEO: वांद्रे-वरळी सी लिंकवर आढळला 4 फूटांचा मृत डॉल्फिन, JCBच्या सहाय्यानं काढलं बाहेर

मुंबईच्या वांद्रा- वरळी सी लिंकजवळ (Bandra-Worli Sealink ) एक 4 फूट लांबीचा डॉल्फिन (Dolphin) मासा आढळून आला आहे. या मृत डॉल्फिनला स्थानिक लोकांनी रात्री 8 वाजता किनाऱ्यावर पाहिलं.

  • Share this:

मुंबई 24 फेब्रुवारी : मुंबईच्या वांद्रा- वरळी सी लिंकजवळ (Bandra-Worli Sealink ) एक 4 फूट लांबीचा डॉल्फिन (Dolphin) मासा आढळून आला आहे. या मृत डॉल्फिनला स्थानिक लोकांनी रात्री 8 वाजता किनाऱ्यावर पाहिलं, यानंतर महापालिकेला याबद्दलची माहिती देण्यात आली. यानंतर बीएमसी (BMC) आणि कोस्टल रोड कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जेसीबी (JCB) मशीनच्या आधारे डॉल्फिनला याठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच काही लोकांनी रॉड, कुऱ्हाड आणि काठीनं एका डॉल्फिन माशाला अत्यंत क्रुरतेनं मारलं होतं. मानवी क्रुरतेचा चेहरा दाखवणारा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये बराच व्हायरलही झाला होता, यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली होता. हा डॉल्फिन मासा नदीच्या किनारी आला होता. स्थानिक लोकांच्या काही टोळक्यानं अगदी आसुरी आनंदानं या डॉल्फिनला जीवे मारलं होतं. संबंधित धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगडजवळील एका गावामध्ये घडली होती.

Published by: Kiran Pharate
First published: February 24, 2021, 7:34 AM IST

ताज्या बातम्या